*उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीस जास्तीत जास्त समता सैनिकांनी उपस्थित रहावे - बाळासाहेब कर्डक*
*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची उत्तर महाराष्ट्राची बैठक ६ मार्च रोजी नाशकात*
नाशिक प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक दि.६ मार्च २०२० रोजी नाशिक शहरातील एचआरडी सेंटर जुना आग्रा रोड,जुन्या एनडीसीसी बँकेजवळ सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात बाळासाहेब कर्डक यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक नाशिक येथे दि.६ मार्च २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता एचआरडी सेंटर, जुना आग्रा रोड, जुन्या एनडीसीसी बँकेजवळ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातील जिल्हा, शहर व तालुका कार्यकारिणी, जेष्ठ समता सैनिक नव्याने जिल्हा, शहर तालुका कार्यकारिणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समता सैनिक यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाळासाहेब कर्डक यांनी केले आहे.