एरडोंल प्रतिनिधी- भारतीय पत्रकार संघाची नुकतीच सहविचार सभा संपन्न झाली त्यात कासोदा येथील दैनिक लोकमत अभ्यासू पत्रकार उपक्रम शील शिक्षक व विविध संस्थांवर कार्यरत असलेले प्रमोद पाटील चिलानेकर यांची नुकतीच भारतीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्वत्र पत्रकार बांधवांकडून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय मानवधिकार एवं सामाजिक न्याय संस्थेचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा लोकमतचे पत्रकार श्री प्रमोद पाटील चिलाणेकर यांची भारतीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एम एस शेख यांनी नियूक्तीचे पत्र पाठविले यावेळी विक्रमसेन जयपाल पाटील रविंद्र नेरकर अनिल सोनवणे चंद्रशेखर गायकवाड विवेक देशपांडे शफिक शेख गोपाल मारवाडी आदिनी अभिनंदन केले चिलाणेकर हे सामाजिक शैक्षणिक सहकार पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यांनी बातमी गावाकडची हा न्युज पोर्टल ला बोलताना सांगितले की भारतीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदाची माझ्यावरची जबाबदारी टाकली मी आगामी काळात पत्रकारांचे संघटन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. व पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले.