अमळनेर नगरपरिषदेत दिव्यांगांसाठी राखीव असलेला 5% निधी तात्काळ खर्च व्हावा यासाठी प्रहार अपंग क्रांती च्या वतीने निवेदन दिण्यात आले.या अगोदर प्रहार अपंग क्रांती चे शहराध्यक्ष योगेश पवार आपल्या अपंग बांधवांसह दि.21 जानेवारी 2020 रोजी मुंबई येथे मा.ना.राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू याची भेट घेतली या भेटी प्रसंगी अमळनेर नागरपरिषदेतील 5% निधी खर्च पडत नसल्याचे व या संदर्भात निवेदन देणार असल्याचे निदर्शनास आणून दिले यावर तात्काळ मा.ना.बच्चूकडू यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. शोभा बाविस्कर यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून दिव्यांग निधी मार्च अखेर पर्यंत खर्च व्हावा असे आदेश देण्यात आले अन्यथा आपल्यावर सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर दि.23 जानेवारी 2020 रोजी नागरपरिषदेचे उप-मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या दालनात बैठक आयोजित करून दिव्यांग निधी संदर्भात चर्चा करण्यात आली.तसेच मा.ना.बच्चूकडू यांनी समंत केलेले निवेदन देतांना प्रहार अपंग क्रांती शहराध्यक्ष योगेश पवार , उपाध्यक्ष नूरखा पठाण , सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई साळुंखे , मधुकर पाटील, शिवाजी शिंदे, आनंदा पाटील, अक्षय कदम, रामदास पाटील तसेच प्रहार सैनिक उपस्थितीत देण्यात आले.