अमळनेर तालुक्यातील रणरागिणी हागणदारीमुक्त करण्यासाठी सरसावल्या
गटविकास अधिकारी संदीपजी वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तैनात
सरपंच, ग्रामसेवक,बचत गट,स्वच्छतादूत शाळामधून नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिले जात हागणदारीमुक्तीचे धडे.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अंमळनेर तालूका हागणदारीमुक्त होण्यासाठी अमळनेर तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी संदीपजी वायाळ व त्यांची टीम यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत गावागावात जाऊन प्रचार प्रसाराचे काम जोरात सुरू आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अमळनेर तालुक्यात दिनांक 1डिसेंबर 2019पासून हागणदारी मुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. पंचायत समिती अंमळनेर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यात जोरदार प्रचार प्रशिध्दी करण्यात येत असून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ऑफिसात हागणदारी मुक्तीसाठी डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात दवंडी देण्यात आली आहे. बेसलाईन व LOB अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी मुदत दिनांक 31डिसेंबर 2019असून बेसलाईन व LOBमध्ये नाव असणारे लाभार्थ्यांना 31डिसेंबर नंतर शौचालयाचे कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही. ज्या कुटुंबांकडे आज शौचालय नाही अशा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव ग्रामसभेच्या ठरावासह तात्काळ सादर करण्याची सूचना ग्रामसेवक व सरपंच यांना दिल्या आहेत. NLOB अंतर्गत शौचालयाचे नाव आॅनलाईन करण्याची मुदत31डिसेंबर 2019 आहे. NLOB अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी मुदत दिनांक 31जानेवारी 2020आहे. तालुक्यातील बचत गटाच्या महिलांचा हागणदारी मुक्तीसाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1500महिलांनी स्वच्छतादूत म्हणून नावनोंदणी केली असून 500महिलांना पंचायत समिती अंमळनेर येथे स्वच्छतादूत म्हणून ओळखपत्र देण्यात आले आहे. अंमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, पंचायत समिती कर्मचारी, आशा, व सर्व सामान्य नागरिक यांनी दोन दिवसात स्वच्छतादूत म्हणून नावनोंदणी करण्याच्या सूचना पंचायत समिती स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. मारवड विकास मंच, दहिवद विकास मंच, प्र.डांगरी विकास मंच व तालुक्यातील इतर स्वयंसेवी संस्था हागणदारी मुक्त करण्यासाठी सरसावल्या आहेत. तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे या अभियानात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. हागणदारी मुक्ती साठी पंचायत समिती स्तरावरुन बॅड माॅर्निंग पथकांची स्थापना करून दररोज कारवाई सुरू आहे. तालुक्यातील सर्व शाळांना शालेय विद्यार्थ्यांची वानरसेना व झाशीची राणी पथक तयार करण्याचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंमळनेर यांना सूचित केले असून परिपाठाच्या तासिकेत हागणदारी मुक्तीसाठी जनजागृती करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंमळनेर यांना देण्यात आले आहेत. सर्व शिक्षक व शिक्षिका यांना सुद्धा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वच्छता दूत म्हणून नावनोंदणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक सिमा रगडे व ज्योती भावसार मॅडम यांनी तालुक्यातील धार, निसर्डी,पातोंडा येथे हागणदारी मुक्तीसाठी महिलांचे मेळावे घेतले आहेत.ढेकू सिम, कन्हेरे, पिंपळी प्र.जं.,मंगरूळ,प्र.डांगरी येथे बचत गटाच्या रणरागिणी हागणदारी मुक्त करण्यासाठी सरसावल्या आहेत. तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय वापरात आणण्यासाठी मोहीम स्तरावर काम सुरू केले आहे. तालुक्याचे भूमिपुञ श्री.संदीप कुमार साळुंखे साहेब मोठ्या प्रमाणावर तालुक्यात जनजागृती करत असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हागणदारी मुक्तीसाठी स्वच्छता दूत म्हणून स्वतः या हागणदारी मुक्तीच्या लढ्यात सहभागी होणार आहेत. 1जानेवारी 2020नंतर कुणीही उघड्यावर शौचाला जाताना आढळल्यास संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. संबंधित लाभार्थ्यांने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी 12000रूपयांचे अनुदान घेतले आढळल्यास संबंधितांकडून ही रक्कम वसूल करण्यात येईल.
गटविकास अधिकारी पंचायत समिती अंमळनेर