बालरोगतज्ज्ञ डॉ शरद बाविस्कर यांनी रेखाटलेल्या शेकडो चित्रांना पाहण्यासाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ शरद बाविस्कर यांनी रेखाटलेल्या शेकडो चित्रांचे प्रतिबिंब या २ दिवसीय भव्य चित्र प्रदर्शनाचे उदघाटन सौ कस्तूरबा बाविस्कर व शंकरराव बाविस्कर यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
'प्रतिबिंब' चित्रपदर्शनाच्या उदघाटन संभारंभात डॉ शरद बाविस्कर यांनी सांगितले की, 'कलेचा उपासक म्हणून मी जोपासलेल्या छंदातून विविध छटांचे चित्र साकारले आहेत'. तर प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित प्रा प्रविण भावसार यांनी 'डॉ बाविस्कर यांनी जोपासलेल्या कलेतून साकारलेले चित्र लक्षवेधी आहेत असे प्रतिपादन केले'. तर धुळे येथिल निवृत्त प्राचार्य एस एन माळी यांनी सांगितले की, 'विद्यार्थी दशेपासून शरद बाविस्कर यांनी आपल्या सृजनशील व्यक्तिमत्वानुरूप साजेसा जोपासलेल्या चित्रकलेचा छंद इतरांसाठी प्रेरणादायी आहे'. तर सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी,'डॉ शरद बाविस्कर यांची चित्रशैली मुक्त असून ती अश्वयुगीन मानवाच्या मुक्त रेखाटन कलेच्या परंपरेतील आधुनिक व सृजनशील कलात्मक आविष्कार आहे! असे सांगितले. प्रस्तावित व सुत्रसंचालन अजय रोडगे यांनी केले.यावेळी रोटरी प्रेसिडेंट पूनम कोचर, डॉ सौ हिरा बाविस्कर आदि मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरी क्लब चे सेक्रेटरी वृषभ पारेख, रोहित संघवी, देवांग शहा,डॉ राहुल मुठ्ठे,डॉ किरण बडगुजर, डॉ गोविंदराव पाटील, प्रा.लिलाधर पाटील, प्रतिक जैन, श्यामदास लुल्ला, चेलराम सैनानी, नितीन कोल्हे,सतिष खंडेरिया, विनायक पिंपळीकर,सुबोध पाटील,महेश पाटील, संदेश पाटील आदिंसह अमळनेर शहरातील अनेक नामवंत व्यक्ती व रोटरी क्लब सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.तर माजी आमदार शिरीषदादा चौधरी, डॉ बहुगुणे,
जि प सदस्या सौ जयश्री पाटील,सुनिल भामरे,आदिंसह मान्यवरांनी यावेळी भेट दिली.
चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन यांनी या दोन दिवस चालणाऱ्या प्रतिबिंब या प्रेरणादायी चित्रप्रदर्शनास उपस्थिती देण्याचे जाहिर आवाहन सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांसह कला शिक्षकांना ही केलेले आहे. आज दिवसभर अनेक शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनीनी शिस्तबद्धपणे चित्रप्रदर्शनातील शेकडो चित्र पाहिले.अनेक शाळांचे शिक्षक शिक्षिका आणि कलेचे विद्यार्थी अध्यापक यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी,कला उपसकांनी उत्स्फूर्तपणे प्रदर्शनात मोठ्यासंख्येने येऊन प्रतिसाद दिला आहे
यावेळी मान्यवरांत डॉ.निखिल बहुगुणे,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, प्रेस फोटोग्राफर महेंद्र पाटील,प्रकाश पारख,जे डी ढवळे,माणिक पाटील,डॉ.संदेश गुजराथी, डॉ.नितिन पाटील, देवरे सर,अरुण चौधरी ,प्रविण पाटील,भरतकुमार बाविस्कर, कविता बाविस्कर, देवेंद्र कोठारी,जयवंत शिसोदे
पत्रकार पाडुरंग पाटील, मिलींद पाटील, गं.का.सोनवणे, ईश्वर महाजन
आदींसह मान्यवर उपस्थित होते.



