Halloween party ideas 2015


CRPF जवानाने केली नागरीकांच्या श्रमदानातून रस्त्याची दुरूस्ती

दि.१० नोहेंबर सध्या धुळे महानगरात भूमीगत पाईपलाईन व गटारींचे कामे चालू  असल्याने व तसेच अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था खूप खराब झाली आहे. त्यामुळे बरिच  धुळेकर जनता तक्रार करतांना दिसतात.पण  एक उदाहरण असे आहे की तक्रार न करता नागरिकांच्या श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करण्यात आला.
अजय नगर  देवपुर धुळे येथील रहिवाशी व सी.आर.पी.एफ कर्मचारी श्री.यशपाल सोनवणे हे दिवाळीच्या सुटी निमीत्त घरी आले होते.सुटीचा शेवटचा दिवस होता पण नित्यनियमाने सकाळी मॉर्निंग वॉक करून जेव्हा यशपाल सोनवणे घरी परत येत होते तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की वरद अपार्टमेंट पासून निर्मल कॉलेजकडे जाणारा रस्ता जो अजय नगर व पाटकर नगर च्या मध्ये खराब झाला आहे.हे निदर्शनात आल्याने यशपाल सोनवणे यांनी स्वतः कुदळ फावडे घेवून रस्ता दुरूस्त करण्यास सुरवात केल्याने परिसरातील काही समाजसेवी नागरीकांचे हात स्वतःहून पुढे आले.व बघता बघता अवघ्या काही वेळातच रस्त्याची दुरूस्ती झाली व ज्या रस्त्यावरून दुचाकी वाहन जाणे देखील कठीण होते तेथून आता चारचाकी वाहने देखील जात आहेत.त्यामुळे परिसरातील नागरीक व सदरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदरच्या रस्ता दुरूस्तीसाठी यशपाल सोणवने यांना शिवाजीराव  जाधव,बी.एच.बाविस्कर,दिनेश बाविस्कर,प्रविण भदाणे,किशोर भदाणे व संजय गुरव आदींनी योगदान दिले.
स्वताच्या घरातील कचरा सार्वजनिक जागेवर किंवा अगदी रस्त्यावर टाकतांना आपण बर्‍याच नागरिकांना बघतो पण अशा सार्वजनिक श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करण्यासारखी उदाहरणे फार क्वचितच दिसून येतात.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.