अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर- शिवसेना ही कायम स्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शिवसेनेने उभारलेल्या " शिव मदत केंद्राचा" दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें यांनी केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने झालेल्या शिव मदतकेंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
- अमळनेर तालुक्यांत गेल्या पंधरवाड्यात परतीच्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, सरसकट पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तात्काळ शासनाची मदत व्हावी तसेच वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हा पीके आडवी झाल्याने हिरावला गेला आहे.त्यामुळे जनावरांना चाऱ्याचाही प्रश्न बिकट झाला आहे.ह्या पावसात घरांची पडझड,फळबागा, व शेतीमाल यांचे नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे तातडीने होऊन भरपाई मिळावी. ह्यामुळे झालेल्या नुकसानास हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी अशीही मागणी करण्यांत आलेली आहे.शेतकऱ्यांना मदती व पंचनाम्या बाबत काही अडचणी असल्यास शिवसेनेच्या दुष्काळग्रस्त मदत केंद्र सुभाष चौक ह्याठिकाणी संपर्क करावा तसेच पिकविमा,तलाठी,ग्रामसेवक यांनी केलेल्या पंचनाम्याविषयी,तसेच शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकविमा बँक खाते विषयी काही तक्रारी असल्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळें (9421516294) तालुकाप्रमुख विजू मास्तर (9158039129) संजय कौतिक पाटील (9028305730) केंद्रप्रमुख नितिन निळे (9922253700) वि. क्षेत्रप्रमुख किरण पवार (9923473737) कृ उ बाजार समिती संचालक महेश देशमुख (9420111133) यांचेशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त वंचित शेतकऱ्यांनी मदत केंद्रावर फॉर्म भरावे असे आवाहन अमळनेर शिवसेनेतर्फे करणेत आले आहे.
सदर मदत केंद्र उदघाटन प्रसंगी शहरप्रमुख प्रताप शिंपी,देवेन्द्र देशमुख,जीवन पवार मोहन भोई, डॉ शशिकांत सोनार, रामचंद्र परब,संदीप बोरसे,विजय पाटील,श्रीकांत पाटील,मिलिंद निळे,हे शिवसेना पदाधिकारी व शेतकरी आसाराम धनगर निंभोरा,कांशीराम पाटील दोधवद, बापू पाटील,विठ्ठल पाटील,नथा नागो पाटील पैलाड,महादू शिंदे रांजणे, विनोद देशमुख गांधली, अशोक शिंपी नगाव,सिताराम काटकर दोधवद, दिलिप पाटील अमळनेर,प्रकाश पाटील, वना पाटील, डिगंबर पाटील,देवळी, नाना निळे अमळनेर,आदी शेतकरी उपस्थित होते व यांनी फॉर्म भरलेत .
