निदान करणारे डॉक्टरांनीच केले रक्तदान, समाजात आदर्श निर्माण करणारे खांडबारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुनील शिंगाणे यांनी दाखवला माणुसकी धर्म
अमळनेर -
तालुक्यातील गलवाडे येथील प्रकाश बडगुजर यांना काल रात्री हार्ट अटॅक आल्यानंतर डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात ऍडमिट केल्यावर प्रकाश बडगुजर यांना O+ पॉझिटिव रक्ताची आवश्यकता होती. सदर माहिती अमळनेर युवा मित्र परिवार या सोशल मीडियातील व्हाट्सअप ग्रुप वर टाकताच रक्तदानाची प्रमुख चळवळ राबवणारे मनोज शिंगाणे यांनी मेसेज वाचल्यावर त्यांनी त्यांचे लहान भाऊ खांडबारा येथील पी एच सी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील शिंगाणे यांना रक्तदान करायला सांगितले. निदान करणारे डॉक्टरच जर रुग्णांशी असे रक्तदान करून महान कार्य करत डॉक्टर हेच देवाचे रूप आहे असे पहिले म्हन म्हटले जायची पण डॉक्टर सुनील शिंगणे यांनी रक्तदान करून ही म्हण खरी ठरवली.अमळनेर तालुक्यात रक्तदानासाठी तत्पर असणारे अमळनेर युवा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या योग्य वापर केला जात आहे. मागील एक दीड वर्षात 300 च्या वर रुग्णांना मदत करून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचे काम या युवा मित्र परिवाराकडून होत आहे. यांच्या कार्याला तहसीलदार, अधिकारी, सैनीक,पोलिस,व्यापारी,शिक्षक,डॉक्टर,पत्रकार,महीला,युवा वर्ग अशा सर्वच स्तरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियातील व्हाट्सअप चे योग्य वापर होताना दिसत आहे. या व्हाटसअपला ग्रुपला एसएमएस पाहताच तात्काळ रक्तदानासाठी ह्या ग्रुप प्रतिनिधींची सेवा रात्री-अपरात्री केव्हाही तयार असतात. आतापर्यंत सुमारे 300 च्या वर रुग्णांना या मित्र परिवारा मार्फत मदत केली गेलेली आहे. यांच हे कार्य तालुक्यापुरते मर्यादित न रहता धुळे,जळगाव,चोपडा,शिरपुर अशा ठिकाणी देखील स्थानीक रक्तदान चळवळ राबणार्यांचा मदतीने रक्तदान पुरविले जाते.सर्व स्तरातून अमळनेर युवा मित्रपरिवार या सोशल मीडियातील व्हाट्सअप ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे. या ग्रुपचे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सत्कारही केले गेले आहे.रक्त हे कुठे तयार होत नाही मानवाचे रक्त मानवालाच लागत असत. समाजात जातीय सलोखा कायम राहतो.दर तिन महिन्यांनी रक्तदान हे करायलाच हव रक्तदानाचे खूप फायदे आहेत अजूनही रक्तदान करायला काही लोक घाबरतात पन हे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे ते सगळ्यांनी करायलाच पाहीजे. या कार्याला अमळनेर युवा मित्र परिवाराचे सभासद योगेंद्र बाविस्कर,राहुल कंजर ,दीपक प्रजापती,भटू विसपुते,पंकज भावसार,राहुल पाटील ,राहुल आहिरे इ. नेहमी रक्तदानसाठी धडपड करत असतात.
