Halloween party ideas 2015


गोरेगाव पंचायत गणात आमचा गाव आमचा विकास कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न 

        बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )  सन 2019-20 मध्ये शासनाचा 14 वा पंचवार्षिक कार्यक्रम  संपत आहे त्यामूळे शासनानाचा 15 वा पंचवार्षिक कार्यक्रम चालू होणार असल्याने या कार्यक्रम अंतर्गत आमचा गाव आमचा विकास हा कार्यक्रम राबविला आहे. या आमचा गाव आमचा विकास कार्यशाळा पंचायत गण गोरेगाव मधील कार्यशाळा आज दि. 14/11/2019 रोजी  वि. रा मेथा वाचनालय गोरेगाव येथे प.स. कृषि अधिकारी नामदेव कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
    या कार्यशाळेस  जि. प. सदस्या अमृता हरवंडकर,  गोरेगाव सरपंच जूबेर अब्बासी , उणेगाव सरपंच राजेंद्र  शिर्के , चिंचवली सरपंच श्रुती लाड , देवळीं सरपंच मानसी भोजने, वडगाव श्री.गावडे, अंगणवाडी परिवेक्षक सौ. सोनार , ग्राम विस्तार अधिकारी श्री. प्रभाकर पोळेकर, माजी सरपंच सुषमा पानावकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. इसवकर , सौ.वैष्णवी पितळे , सौ.शाईन लोखंडे  , सौ.वर्षा लाड, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शहा ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

      आमचा गाव आमचा विकास सन  2020-2021ते सन 2024-2025 चा विकास आराखडा महिला ग्रामसभा , बालग्रामसभा व वंचित घटकांची ग्रामसभा लावून त्यांच्या मूलभूत गरजाचा विचार  करून गावचा विकास आराखडा तयार करावा. गावातील प्रत्येक घटकाचा विचार करून प्राधान्य क्रम ठरवून ग्रामसभा लाऊन हा आराखडा तयार करवा असे श्री नामदेव कटरे यांनी सागितले.
     तसेच  या आराखडा ची प्रसिद्धी अंगण वाडी सेविका , आशा , बचत गट महीला, कृषि सेवक व तलाठी यांनी गावात प्रसार करणे, ग्रामपंचायत मार्फत देणाऱ्या सेवा , महिला बचत गटांना प्राधान्य , 
शाळा , हायस्कूल मधील मुलांना आवश्यक गरजा त्यांच्या मागण्या , आरोग्य , स्वछ पाणी , बाल शोषण विरोधी मोहीम , अंगणवाडी मध्ये बालकांना आवश्यक गोष्टीन विचार करणे , बाल ग्रामसभा , महिलांना आवश्यक गोष्टी काय हवेत , गरीबातील गरीब मांसाचे राहणीमान उंचावेल , महिला शिक्षण , रोजगार या सर्व गोष्टीन वर विचार करून हा आराखडा तयार होणे गरजेचे कृषि अधिकारी श्री कटरे यांनी सांगितले.

      या कार्यक्रमास गोरेगाव पंचायत गणमधील सर्व माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य , सर्व ग्रामसेवक,  अंगणवाडी सेविका व  आशा उपस्थित होत्या. पण महत्वाचे दुवा असणारे कृषि सेवक व तलाठी यावेळी उपस्थित नव्हते.या वेळी अंगणवाडी पर्यवेक्षक सौ. सोनार यांनी प्रस्तावना केली तर आभार प्रदर्शन गोरेगाव सरपंच जूबेर अब्बसी यांनी केले.

फोटो कॅप्शन - आमचा गाव आमचा विकास आराखडा कार्यशाळेत मार्गदर्शन करीताना पंचायत समिती कृषि अधिकारी श्री. नामदेव कटरे, जि. प. सदस्या अमृता  हरवडंंकर, गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी व इतर मान्यवर दिसत आहेत. ( छाया : विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव )

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.