आमदार अनिल पाटील
अमळनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खरीप हंगामातील ज्वारी बाजरी मका कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांना योग्य असा भाव मिळावा यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे अशी मागणी अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी फँक्सद्वारे राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
कापसाची खरेदी खाजगी व्यापारयाकडून साडेतीन ते चार हजार रुपये दराने केली जात आहे. वेदर हमीभावापेक्षा ही कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी राज्यप्राणी आदेश देऊन राज्यात सीसी आईच्या सर्व संकलन केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. शेतकऱ्यांना धीर द्यावा कपाशी े शेतकर्यांचे नगदी पीक असून त्याला हमी भाव द्यावा बोनस जाहीर करावा अशी मागणी तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
अमळनेर तालुक्यात ज्वारी बाजरी मका सोयाबीन कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा टाकलेला खर्च निघेल का? असा प्रश्न पडला आहे पशुधनाचा चारा खराब झाल्यामुळे पशुधनासाठी चारा कुठून आणावा या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे शासनाने लवकरात लवकर शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांमध्ये होत आहे.