दैनिक साईमत वर्धापन दिनानिमित्त लेख
ईश्वर महाजन
अमळनेर प्रतिनिधी
9860352960
अमळनेर तालुक्याच्या विकासात श्री मंगळग्रह मंदिर, दगडी दरवाजा, संत सखाराम महाराज प्रतिपंढरपुर विठ्ठलाचे मंदिर,१५० वर्षाचे पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय
श्री मंगळ देव ग्रह मंदिर समस्त भारतातील अतिप्राचीन अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिर
अमळनेर तालुक्यातील मंगळग्रह मंदीराबद्दल माहिती
अमळनेर येथे महाराष्ट्रातील एकमेव पुरातन असे मंगळग्रह मंदिर आहे. मंगळग्रहाच्या जगातील दोन मंदिरांपैकी हे एक आहे. सदर मंदीर हे संपूर्ण भारतात फक्त दोन ठिकाणी आहेत 1) पश्चिम बंगाल 2) महाराष्ट्रात अमळनेर तालुक्यात चोपडा -अमळनेर राज्य महामार्ग क्रं-१४ वरती आहे. सदर मंदीरमध्ये दर मंगळवारी प्रचंड प्रमाणात दर्शनकरीता भाविकांचा ओघ असतो. तसेच मंदीर परीसरात बगीचा असल्याने दाट वृक्ष लागवड केल्याने सदर परीसर खुपच आल्हाददायक व प्रसन्न वाटतो त्यामुळे इतर दिवशीही मंदीर परीसरात खुप गर्दी असते. या मंदिर परिसराच्या विकासासाठी मा.आमदार कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी सर्वांगिण आराखडा आखला होता आणि याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या शिफारसीनुसार २० डिसेंबर २०१२ रोजी मंगळग्रह मंदिराचा जिल्हा पर्यटन वृहत आराखड्यात समावेश करण्यात आला होता.
मंगळ ग्रह मंदिराचे धार्मिक पाविञ्य व महत्व जपत आपण सर्व अमळनेरकर या ठिकाणाला एक प्रेक्षणिय आणि निसर्ग सौदर्याने परीपूर्ण स्थळ म्हणून विकसित करण्यात यशस्वी झाले आहत. येथील उद्यानास वनस्पती शास्त्रानुसार परीपुर्ण करण्यातही आपण प्रयत्नशिल आहात ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात या स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून मान्यता मिळावी व तसा पर्याप्त निधी शासनाने द्यावा अशी अपेक्षा आहे.माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळग्रह संस्थेला मोठा निधी प्राप्त करून दिला आहे.
जाणकारांच्या मते संपूर्ण भारतात फक्त दोन ठिकाणी स्वतंत्रपणे श्री मंगल देव ग्रह देवाचे मंदिर आहे.
अमळनेरचे श्री मंगल देव ग्रह मंदिर कोणी बांधले ? मूर्तीची स्थापना कोणी केली व केव्हा केली ? या बाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही .
श्री मंगळ देव ग्रह मंदिर अत्यंत दुर्मिळ व जागृत स्थान असल्याने सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे . ज्या मुला मुलीना मंगळ आहे अशा मुला मुलींना लग्नाकरिता अडचण निर्माण होते त्या करिता येथे अभिषेक व पूजा केली जाते. मनोहारी मंदिरात विराजमान श्री मंगळ ग्रह मंदिरात शीस्तबध्द प्रवेश करण्यासाठी रांग
लावणाऱ्या भाविकांकरिता सुंदर शेड बांधण्यात आली आहे. बाराही महिने मन प्रसन्न करणारा तुळस बगिचा, बालकांना खेळण्यासाठी अनेक साधने असलेला व वनराईने नटलेला रोटरी गार्डन, मंगळ वनातील बंधाऱ्यात साठलेले पाणी म्हणजे निसर्गाचा साक्षात आरसाच… तुळसी बगीच्यातील प्रसन्नवदन भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर नितांत सुंदर कारंजा व रोषणाई… नवकार कुटी व त्या खालील भगवान श्री शंकराची मूर्ती व जटातून बरसणाऱ्या धारा व धबधबा असे मनोहरी दृष्य पहावयास मिळते. दर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत फक्त १५ रुपयात महाप्रसाद उपलब्ध असतो.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील अनेक दिग्गज सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ मंगळग्रह संस्थानच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असतात.
२)
अमळनेरचे वैभव असलेल्या पुरातन दगडी दरवाजा
मध्य युगीन इतिहासाची साक्ष असलेला हा दरवाजा पुरातत्त्व खात्याच्या अत्यारीत येतो.अमळनेर शहराचे वैभव असलेला पुरातन दगडी दरवाजाचा एक भाग आज पावसामुळे कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी यात झालेली नाही. अमळनेर शहराचे प्रवेशद्वार म्हणून या दरवाजाकडे बघितले जाते. हा दरवाजा नेमका कुठल्या कालखंडात कोणी बांधला याची निश्चित माहिती नाही. सिंहगडाच्या बुरुजाप्रमाणे याची प्रतिकुती आहे. मध्य युगीन इतिहासाची साक्ष असलेला हा दरवाजा पुरातत्त्व खात्याच्या अत्यारीत येतो. स्वतंत्र प्राप्ती नंतरचे पहिले झेंडा वंदन या दरवाजावर झाले आहे.दगडी दरवाजा हा अमळनेर शहराचे वैभव मानले जाते. हा दरवाजा अत्यंत जुना असुन तो पुरातन विभागाच्या अखत्यारीत येतो. दरवाज्याला काही दिवसांपूर्वी एका गाडीने जोरदार धडक लागली होती. त्यामुळे त्या वेळी दरवाज्यास हानी पोहचली होती. नंतर गेल्या तीन दिवस आगोदर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातन विभागाला पत्र देऊन या बाबत माहिती दिली होती. मात्र तरी देखील पुरातन विभागाला जाग आली नाही. परिणामी आज दगडी दरवाजा पुर्वी कडील एका बाजूने कोसळला आहे. याबाबत माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील व विदयामान आमदार अनिल पाटील आ.स्मिता वाघ यांनी दगडी दरवाजा कोसळलेल्या भागातील पिशव्या काढाव्या,त्या कोसळण्याची शक्यता आहे. प्राणहानी होऊ शकते
त्यांचे बांधकाम त्वरित करावे अशी शहरातील जनतेची माफक अपेक्षा आहे.
३)
अमळनेरचे भूमी पावन करणारे संत श्री सखाराम महाराज
पिंपळी तालुका अमळनेर जवळ असलेले खेडेगाव त्याठिकाणी मूळ अमळनेर चे रहिवासी असलेले रामभट शेटे वास्तव्य करीत होते. सीताबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव, पुत्ररत्न नव्हते म्हणून राम भटांनी दुसरा विवाह केला.पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर पहिल्या पत्नीला म्हणजे सीताबाईंना 1757 साली पुत्ररत्न झाले. नाव ठेवले सखाराम...
सखारामाच्या बालपणीच भविष्य वर्तवले गेले की हा पूर्वजन्मीच्या योगी असून संसारात राहूनही संसारात आसक्ती ठेवणार नाही .पंढरीची वारी करून रुक्मिणीकांताला वश करील. सखाराम पाच वर्षाचा असताना आई गेली ..थोडे कळू लागल्यावर दगडाचे टाळ करून अखंड हरीचे भजन करीत असे .आठव्या वर्षी व्रत बंध झाल्यावर त्याने सखारामला बराच हितोपदेश केला. सखारामला भजन बरोबर सवंगड्यांना संतांच्या कथा सांगण्यात खूप आनंद होत असे पुढे राम भटाचे निधन झाल्यावर चुलत बंधू रंगणाथ यांनी सखाराम विद्याभ्यासासाठी अमळनेरला आणले.
हरिभजनात सतत्त नवीन होणाऱ्या सत्ताकारणाची अभ्यासात फारसे लक्ष नसायचे अकराव्या वर्षी एका पण तो जिकडे शिक्षणास सुरुवात झाल्यानंतर इष्ट तो परिणाम दिसून येत नाही हे दिसून आल्यावर तुकारामाचे चोपडा येथील श्रीधर मामा यांनी सखाराम यज्ञकीचे शिक्षण देण्यासाठी चोपड्याला नेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जीवनाला स्थिरता येण्यासाठी सोळाव्या वर्षी सखारामाच्या विवाह मुरारी भट यांनी कन्या गंगा बरोबर करण्यात आला.
परमार्थाकडे ओढ असलेल्या सखारामाची प्रपंचात फारसे लक्ष लागत नव्हते. यांच्या विवाह प्रसंगी प्रत्यक्ष पांडुरंग कांते सह एका ब्राह्मणाच्या रूपाने आले होते व त्यांनी जाताना उपदेश केला होता तर संख्या एवढे करी! धरावी पंढरीची वारी! येउनी आमचे मंदिरी भेटी आम्हा देईजे! त्यामुळे पंढरीची वारी करण्याची पंढरीनाथाला भेटण्याची विलक्षण सखाराम लागली होती. व्यवसायात यश मिळत नव्हते त्यामुळे घरात शांतता असलेली त्याला वैतागून सखारामने वारीला जाण्याची इच्छा व्यक्त केली पण पत्नी गरोदर असताना तू जाऊ नकोस असा मोळता चुलत बंधूंनी घातला.शेवटी एक अधिकारी त्यांना पंढरपूर घेऊन जातात. पत्नीच्या आणि पुत्राच्या आगमनाने उद्दीग्नता अधिकच वाढली. सखारामाची अशा वागण्याने काही लोक निंदा करीत असतात तर काही लोक त्यांच्या भगवत भक्तीचे विरक्तपणाचे कौतुक करीत असत.
अमळनेरचे विठ्ठल मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे याठिकाणी मे महीन्यात संत सखाराम महाराजाची यात्रा बोरी नदी पंधरा दिवस भरलेली असते .लहाणापासून ते अबालवृदध या यात्रेत येऊन आपल्या मुलांना पाळण्यात बसण्याचा आनंद घेतात.महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी विठ्ठलाला साकडे घालताना दिसतात अनेक भाविकांच्या मनोकामना पुर्ण होतात. याच वर्षी संत सखाराम महाराज द्विशतक कार्यक्रम संपन्न होऊन अनेक राज्यातील संतांच्या पदपर्शाने अमळनेर शहराची भूमी पावन झाली.
सद्गुरु सखाराम महाराजांच्या गादी परंपरेला दोनशे वर्षे पूर्ण झाले आहेत.
पुज्य सखाराम महाराज , पुज्य गोविंद महाराज,पुज्य बाळकृष्ण महाराज ,पूज्य प्रल्हाद महाराज ,तुकाराम महाराज , पुज्य श्रीकृष्ण महाराज ,पुज्य बाळकृष्ण महाराज ,पुज्य वासुदेव महाराज,पुज्य पुरुषोत्तम महाराज ,पुज्य ज्ञानेश्वर महाराज,पुज्य प्रसाद महाराज आज तागायत गादीवर बसलेले आहेत.
४)
150 वर्षाची परंपरा असलेले पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय नुसते पुस्तकांचे ग्रंथालय नाही तर अमळनेर शहराच्या सांस्कृतिक अभिसरणाचे केंद्र व सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर आहे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून वाचनालयाचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू आहे. व केंद्राचे संचालक विजयसिंह पवार व त्यांची टीम भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देऊन त्यांचे भविष्यातील अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरतांना दिसत आहे व या स्पर्धा परीक्षा केंद्राचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे. आतापर्यंत ह्या वाचनालयात अनेक एक दिग्गज साहित्यिकांनी भेट दिली आहे.
सद्यस्थितीत या ग्रंथालयाच्या संग्रहालयात 35000 ग्रंथ आहेत याशिवाय दैनिक वृत्तपत्रे मासिके नियतकालिके दिवाळी अंक संदर्भग्रंथ यासह दुर्मीळ हस्तलिखित ग्रंथ आहेत त्याचा लाभ सुमारे 2300 वाचक घेतात. शासनाच्या विविध योजनेतून ग्रंथालयात मोलाची मदत होते. शासनाने राज्यातील 83 ग्रंथालयांना त्यांनी सेवेची शताब्दी पूर्ण केली म्हणून 5 लक्ष विशेष विकास अनुदान दिले. अनुदान ग्रंथालयात प्राप्त झाले त्यातून ग्रंथालयाच्या वाढते व्यापानुसार सुसज्ज इमारत बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी केंद्र शासनाचे सांस्कृतिक कार्य खाते अंतर्गत असलेल्या राजाराम मोहन राँय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या योजनेत ग्रंथालयात 11.58 लक्ष अनुदान प्राप्त झाले त्यात स्थानिक देणगीदारांच्या सहकार्याने भर घालून प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे विद्यमान संचालक मंडळाच्या ठरावानुसार ग्रंथालयाने आता सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र नावाने होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रासाठी अमळनेर शहराचे अध्यात्मिक दैवत परमपूज्य प्रसाद महाराज यांनी एक लाख रुपये देणगी दिली आहे या केंद्रात सध्या चाळीस विद्यार्थी लाभ घेत आहेत. सुमारे एका वर्षात या केंद्रातून बरेच विद्यार्थी यशस्वी होऊन अधिकारी झाल्याचे मनस्वी आनंद होत आहे. यासाठी या केंद्राचे संयोजन विजय सिंग पवार शिरसाळे हे शिक्षक करीत आहेत.
वाचन संस्कृती लयाला जात आहे असे म्हणत बसण्यापेक्षा ग्रंथालयांचे वाचक भिमुख कशी होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे उपक्रम ग्रंथालयाने आयोजित करणे गरजेचे असते यासंदर्भात सानेगुरुजी ग्रंथालयाचे उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार विविध विषयावर उद्बोधन व्याख्यानमाला चर्चासत्र स्पर्धा पुस्तक प्रदर्शन स्थानिक विविध संस्थांचा साहित्यविषयक कार्यक्रमात सक्रिय सहभाग अशा उपक्रमामुळे विद्यमान संचालक मंडळ यांनी ग्रंथालयाचे कार्याचा विस्तार केला आहे व तो पुढेही चालू राहील यात शंका नाही.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत यांच्यावतीने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात 23 व 24 नोव्हेंबरला विभागीय खानदेशी बोली साहित्य संमेलन धूमधडाक्यात होणार आहे. यासाठी राज्यातील साहित्यिक कवींची उपस्थिती लाभणार आहे यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे उपाध्यक्ष प्रा.माधुरी भांडारकर चिटणीस प्रकाश वाघ संयुक्त चिटणीस सुमित धारकर विश्वस्त बापू नागावकर व संचालक मंडळ यासाठी प्रयत्नशील आहे.
अमळनेर तालुक्यातील एकमेव अ वर्ग ग्रंथालय शहराचे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र ,अभिरुचीसंपन्न वाचक घडवणारे केंद्र ,साने गुरुजींचा दुर्मिळ हस्तलिखितांचा ठेवा जपणारे ग्रंथालय , सामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचे केंद्र विविध उपक्रम चालवणारे महाराष्ट्रातील एकमेव वाचनालय व ग्रंथालय असावे यात शंका नाही.
