डॉ उज्जवलकुमार चव्हाण
आयकर उपायुक्त मुंबई
अमळनेर प्रतिनिधी- तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा, तुम्ही नकारात्मक असाल किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही ती व्यक्ती तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना कंम्फरटेबल राहा, तुमच्या बॉडी लॅंग्वेज वर भर द्या त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकतात. भाषण करताना बॉडी लॅंग्वेजला ही खूप महत्त्व आहे.
ते पुढे म्हणाले की भाषेचा अभिमान असावा अनुभवातून सामाजिक जाणीव निर्माण होते सामाजिक जाणिवेतून माणूस सामाजिक काम करतो सामाजिक काम करीत असताना संवाद कौशल्य भाषा कौशल्य खूप महत्त्वाचे आहेत असे
सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विदयामाने आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमाला दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉ उज्जवलकुमार चव्हाण आयकर उपायुक्त मुंबई यांनी सामाजिक उपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर अमळनेर जी.एस हायस्कूल येथे आय.एम.ए.हाँलमध्ये मार्गदर्शन करतांना बोलत होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग.स.चे उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे होते.प्रमुख अतिथी जयेश काटे, दत्तात्रय सोनवणे होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश काटे यांनी केले.प्रमुख वक्ते डॉ चव्हाण यांचा परिचय निरंजन पेंढारे यांनी केले.
डॉ चव्हाण म्हणाले की व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पैलू त्यांनी उलगडून दिले त्यात ड्रेसिंग सेंस सुधारा, आत्मपरीक्षण करा ,इतरांचा आदर राखा, कॉन्फिडन्ट रहा, विनोदी राहा चांगले श्रोते व्हा वाचन करा नवीन लोकांना भेटा तुम्हाला स्वतःचे मत असू द्या स्वतःला जाणून घ्या असे सांगत आपल्या खानदेशातील अहिराणी भाषेतून श्रोत्यांची मने जिंकली भाषेचा अभिमान असला पाहीजे बऱ्याच वेळा अहिराणी भाषा बोलताना काहींना कमीपणा वाटतो पण भाषेतून भाषा जपली जाते हेही तितकेच महत्त्वाचे आहे म्हणून ज्या ठिकाणी आपण जातो त्याठिकाणी त्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून ग.स पतपेढीचे उपाध्यक्ष शामकांत भदाने म्हणाले की सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंच व शिवशाही फाउंडेशन अमळनेर यांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून यातून भावी पिढीला ज्ञानू संस्काराची शिदोरी चांगल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळत असल्याचा सर्वस्वी आनंद आहे. त्यांचे प्रबोधनाचे काम भविष्यातही असेच सुरू राहील त्यासाठी मी विचारमंच व फाऊंडेशनला शुभेच्छा देतो असे सांगितले.
कार्यक्रमात ज्ञानदानाच्या कामाबरोबरच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षक अशोक पाटील, ग.स.पतपेढीचे उपाध्यक्ष श्यामकांतजी भदाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डि.ए.धनगर, आदर्श शिक्षक राजेंद्र सुर्यवंशी, आर.पी.मोराणकर,पत्रकार ईश्वर महाजन यांना सन्मानपत्र डॉ उज्जवलकुमार चव्हाण आयकर आयुक्त मुंबई व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सतीश देशमुख, गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाळे,प्रा एस.ओ.माळी, केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, ग.स संचालिका विदयादेवी कदम,छाया सोनवणे, पत्रकार जी.टी.टाक,वाल्मिक मराठे, व मुख्याध्यापक, शिक्षक,समाजसेवक, पालक ,विद्यार्थी बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन अमळनेरचे दत्तात्रय सोनवणे,
अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, डि.ए.धनगर, उमेश काटे, विजय पाटील,मनोहर नेरकर, शरद पाटील, प्रेमराज पवार, रामकृष्ण बाविस्कर, वाल्मिक पाटील, रत्नाकर पाटील, रवींद्र पाटील, कुणाल पवार, गोपाल हडपे,निरंजन पेंढारे, विजयसिंग पवार, जयेश काटे यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.आभार प्रदर्शन मनोहर नेरकर यांनी केले.


