Halloween party ideas 2015


माणगांव पोलीसांची खरवली व बोरघर येथील अवैध दारू अड्यांवर कारवाई - मुद्देमाल जप्त

        बोरघर /माणगांव ( विश्वास गायकवाड ) 

माणगांवात देशी, विदेशी, गावठी दारू अवैधरित्या विकणाऱ्या अड्ड्यांवर माणगांव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 
माणगाव पोलीस ठाणे हद्दीत  पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दिनांक 10/10/2019 रोजी 20:25 वा च्या सुमारास खरवली गावच्या हद्दीतील आरोपि अनिल बाळाराम लहाने  रा.खरवली ता.माणगाव याने मौजे त्याचे राहत्या घराच्या पडवीत 624/-रु. ची देशी दारू संत्रा गोल्ड जिएम असे नाव असलेल्या एकूण 6 प्लॅस्टिकच्या सीलबंद 180 मिलीच्या बाटल्या प्रत्येकी 52/- रु. किंमत असलेल्या तसेच 12 सीलबंद 90 मिलीच्या बाटल्या प्रत्येकी 26 रु. किंमत असलेल्या तसेच 840/- रु. कीमतीच्या विदेशी दारू डी एसपी ब्लॅक असे नाव असकेल्या एकूण 6 काचेच्या सीलबंद 180 मिलीच्या बाटल्या प्रत्येकी 140/- रु किमंत तसेच 900/- रु. किमतीची विदेशी दारू 6 काचेच्या सीलबंद बाटल्या असा एकूण 2364/-रुपये किमतीची विनापरवाना गैर कायदा देशी विदेशी दारुच्या बाटल्या बाळगले स्थितीत मिळुन आला. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 11/10/2019 रोजी 00:06 वा. सुमारास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील एकूण 2364/-रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
        याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा कॉ.गु.र.न.165/2019 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (e)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पो. नि. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास  पोह/1478 पाटील हे करीत आहे.
   बोरघर आदिवासीवाडी येथे आरोपी दौलत भीवसेन मुकणे याच्या घरी 10 ली. गावठी हातभट्टीची माणगांव पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. यावरुन माणगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि नं. 166/2019 कलम 65(e) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.