Halloween party ideas 2015


अमळनेर तालुक्यात परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम वाया,
पिकांचे त्वरीत पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी आमदार साहेबराव पाटील यांची मागणी.

अमळनेर प्रतिनिधी

खरीप २०१९ हंगामातील परतीच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे
पंचनामे करुन जळगांव जिल्ह्यात “ओला दुष्काळ"जाहीर करावे अशी मागणी अमळनेर तालुक्यातील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
  जळगांव जिल्ह्यातील बहुतांशी भागातील सर्वच शेतकऱ्यांना परतीच्या सततच्या पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवाची पिके पाण्याखाली गेली आहेत.
हाताशी आलेला घास सततच्या पावसाने हिरावून घेतला असल्याने बळीराजाची “ ईडा-पिडा"टळेनाशी झाली आहे. संपूर्ण जळगांव जिल्ह्यात वार्षिक सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात परतीचा
"पाऊस" लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले असून चिंतेचे सावट आहे, याचे आपणास ज्ञात आहेच.
सबब जिल्ह्यातील बहुतांश भागात सततच्या परतीच्या पावसामुळे खरीपाची पिके सडूनगेली आहेत. किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे. ऐन दिवाळीच्या पर्वात “जगाचा पोशिंदा" बळीराजा
हवालदिल झालेला आहे. सर्वत्र “दाणादाण झालेली असून शेतकरी बांधवास “दिलासा" देण्यासाठी
युद्ध पातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त जळगांव जिल्ह्यात “ओला दुष्काळ” जाहिर करुन शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आपणासह सर्व
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी शासनाकडे एकमुखी मागणी करुन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजी आमदार पाटील यांनी केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.