Halloween party ideas 2015

*ग्रामरोजगार सेवकांचे थकीत  मानधनाअभावी दिवाळी अंधारात*

*पारोळा (प्रतिनिधी)* - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पात्र जॉब कार्डधारक मजुरांची हजेरी भरण्याचे काम करणारा आणि शासन व मजुर यांच्यातील प्रमुख दुवा म्हणजे ग्रामरोजगार सेवक आहे. जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मार्च 2019 पासुन सात महिन्याचे थकीत आहे. तरी प्रत्येक तालुक्यातील मनरेगा विभागातुन दिवाळीच्या सणासाठी एक महिन्या अगोदर मानधन मागणी केली असती तर आमच्या ग्रामरोजगार सेवकांची आणि त्यांच्या कुटुंबांची दिवाळी अंधारात गेली नसती. मनरेगा विभागातील शासन परिपत्रक असे आहे की, ग्रामरोजगार सेवकांचे गेल्या महिन्याचे मानधन येणाऱ्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत देणे बंधनकारक आहे. असे सुचित असल्यावर सुद्धा जिल्ह्यातील मनरेगा विभागातुन त्या शासन पत्रांचा फक्त बोलबाला केला जातो. आणि त्यावर काहीच कडक अंबलबजावणी केली जात नाही. त्यामुळे असे दिसुन येते की जिल्हा मनरेगा विभागाचे तालुक्यातील मनरेगा विभागावर काहीच नियंत्रण राहिलेले नाही. कारण तालुक्यातील मनरेगा विभागातील कर्मचाऱ्यांचे दिवाळीच्या अगोदर मानधन भेटते आणि त्याच विभागाचे ग्रामरोजगार सेवक यांचे सात महिन्याचे थकीत मानधन दिवाळीच्या अगोदर भेटू शकले नाही. यावर जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व यात शंका निर्माण होते की आपले मानधन दिवाळीच्या सणाला का मिळाले नाही. तरी ग्रामरोजगार सेवकांना वेळेवर मानधन मिळाले नाही, का मिळाले नाही यात कोण दोषी आहे ह्या गोष्टींचा शोध घेणे गरजेचे आहे व त्यांच्यावर वेळीच कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून करण्यात येतं आहे. तसेच आमचा ग्रामरोजगार सेवक राब राब राबुन ग्रामीण भागात मेहनत करून सुद्धा त्यांचे हक्काचे मानधन दिवाळी सणाला मिळाले नाही. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक आणि त्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात जात आहे. यावर तालुक्याच्या ठिकाणी जे कर्मचारी मानधानासाठी दोषी असतील आणि वरिष्ठांच्या पत्र व्यवहाराचा मनमानी पणाने अवमान करत असतील त्या त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी. अशी मागणी जळगांव जिल्ह्याचे कार्यक्षम असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघ जळगांव जिल्हा तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे आणि जिल्हा सचिव अतुल पाटील यांच्याकडून करण्यात येतं आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.