Halloween party ideas 2015

भाषेचं महत्व - प्रा झेड.एन.पाटील

भाषा हे एक साधन आहे.विचार,भावना,ज्ञान इत्यादी व्यक्त करायचं ते माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातुन आपण प्रामुख्याने चार गोष्टी करत असतो. आपल्या अवती-भोवती वावरणाऱ्या लोकांशी आपण संबंध प्रस्थापित करत असतो.  असलेले संबध अधिक घट्ट करत असतो. आपण भेटल्यावर नमस्कार, रामराम, वालेकुम सलाम, जय जिनेंद्र, जय भीम, जय ज्योती जय क्रांती असं म्हणत असतो.  अवतीभवतीच्या लोकांच्या तब्बेतीची, त्यांच्या  कुटूंबियांची चौकशी करत असतो. 
 हा झाला भाषेचा सामाजिक पैलू. भाषेला दुसरा एक पैलू आहे. आपल्या आवडी-निवडी भाव-भावना व्यक्त करण्याचा पैलू. आपण सभोवतालच्या लोकांविषयी,  ठिकाणांविषयी, घटनांविषयी, राजकीय पक्षांविषयी, वैयक्तिक संबंधांविषयी आपली मतं आपण व्यक्त करत असतो. भाषेतून आपण माहिती,ज्ञान व्यक्त करत असतो. इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयीची माहिती आपण व्यक्त करत असतो. हा भाषेचा तिसरा पैलू. भाषेच्या माध्यमातून आपण सभोवतालच्या लोकांचं वागणं नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण सल्ला देतो, विनंती करतो, हे कर, ते करू नको असं म्हणत असतो. हे सगळं करत असतांना आपल्याला अवतीभवतीच्या लोकांशी असलेल्या संबंधाविषयी काळजी घ्यावी लागते. त्यांच्या भावना, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांची मतं, त्यांचा दृष्टिकोन, यांचा आदर ठेवून वागावं लागतं. आपण समाजात जन्माला येतो, समाजातच मोठे होतो, त्यामुळे लोकांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं. 
हिंदीत असं म्हटलं जातं 
"शब्द संभाले बोलिए, शब्द के हाथ ना पाँव;
एक शब्द करे भलाई, दुजा करे घाव!"
भाषेला हाथ नसतात. ती आपल्याला मारू शकत नाही. गुद्दे लगावू शकत नाही. भाषेला पाय नसतात. ती आपल्याला लाथाही मारू शकत नाही. तरी सुद्धा आपण भाषेचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. याचं कारण असं की भाषा हे दुधारी हत्यार आहे.गोड शब्द, प्रेमळ शब्द आपल्याला अनेक मित्र मिळवून देतात. कटू, कडवट, तुसडे शब्द केवळ शत्रू निर्माण करतात. आपण घरात, शाळेत, समाजात या गोष्टीचं शिक्षण मुला-मुलींना दिलं पाहिजे.


मा.श्री.प्रा.झेड.एन.पाटील,सर
देवगाव-देवळी ता अमळनेर जि जळगाव ह.मु पुणे 
 मो.93268 97527

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.