Halloween party ideas 2015


शिरूड जिल्हा परिषदेच्या शाळेला सर्वागीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनचा आर्थिक हातभार

अमळनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरूड तालुका अमळनेरचे दानशूर माजी विद्यार्थी  शिरुड विकास मंचाचे कार्यकारी सदस्य पुणेस्थित दादासो धनराज भगवान पाटील दादासो विलास भगवान पाटील हे सतत चार वर्षापासून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आर्थिक मदत करीत आहेत आतापर्यंत सुमारे एक लाख रुपये त्यांनी मदत केली आहे त्यांच्या मुलांचे वाढदिवस निमित्त शाळेला देणगी देतात व शाळेत वाढदिवस साजरा केला जातो याअंतर्गत दिवाळी सेलिब्रेशन या उपक्रमात सतत तिसऱ्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ व मिठाई वाटप साठी मदत पाठवली आहे 
 यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली दिवाळीचा गृहपाठ विद्यार्थ्यांना मिळाला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.