Halloween party ideas 2015


उत्कृष्ट सूत्रसंचालक कला भूषण परमेश्वर रोकडे यांचा ग स सोसायटीच्या पदाधिकारी यांनी केला सत्कार
 
धरणगाव प्रतिनिधी- धरणगाव येथील बालकवी शाळेचे उपक्रमशील शिक्षक परमेश्वर रोकडे यांनी नुकतेच आशिया खंडातील नामवंत पतपेढी म्हणून जिचा नावलौकिक आहे अशा पतपेढीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करण्याचा त्यांना योग आला. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याने सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील उपाध्यक्ष शामकांत भदाणे व संचालक मंडळ भारावले त्यांचा यथोचित सत्कार ग स चे अध्यक्ष मनोज पाटील उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे व संचालक मंडळांनी शाल बुके देऊन सत्कार केल्याने त्यांच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला.
बालकवी शाळेचे कलाशिक्षक परमेश्वर रोकडे हे गेल्या काही वर्षांपासून कला विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पना चित्रकलेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन
करून त्यांच्या कलाकृतींना वाव देण्याचं काम रोकडे सर करीत आहेत त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सरांचे अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखही चित्रकलेच्या माध्यमातून अनेक उपक्रम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे रोकडे सरांचे बातमी गावाकडची ह्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.