Halloween party ideas 2015





देवगांव देवळी हायस्कूलच्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून केले वृक्षारोपण
अमळनेर प्रतिनिधी- सध्या वरूण राजा बरसात असल्याने अमळनेर तालुक्यात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना वेग आला आहे. आपल्या शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करावे शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले त्यांच्या शब्दाला शिक्षकांनी क्षणाचा विचार न करता वृक्षारोपणासाठी लागणारे साहित्य सात जाड्या ,बांबू ,सात  मोठी कडूनिंबची रोपे  आपल्या स्वखर्चातून आणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम  उत्साहपूर्वक वातावरणामध्ये पार पडला.
            शाळेचे  जेष्ठशिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन ,सुरेश महाजन, हरी माळी व शिक्षकेतर कर्मचारी निंबा देशमुख, संभाजी पाटील  ,गुरूदास पाटील यांनी सहकार्य वृक्षारोपण करण्यासाठी मदत केली. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी आव्हान केले. वृक्षसंवर्धन ही सगळ्यांची जबाबदारी आहे असे मुख्याध्यापकांनी अनिल महाजन यांनी सांगितले.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.