सर्वत्र अभिनंदन!
अमळनेर प्रतिनिधी
मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणार्या 'मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट' या पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातील भूषण महाले व नांदेड जिल्ह्यातील दिपक भांगे यांची निवड करण्यात आली आहे.
वर्गातील अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरुन शिक्षण पद्धतीला वेगळे आयाम देणार्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी लोकमान्य विद्यालय (ता.अमळनेर जि.जळगाव) येथील तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव (ता.नायगाव जि.नांदेड)
येथील तंत्रस्नेही शिक्षक दिपक भांगे
यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. भूषण महाले यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने तसेच स्काईपच्या मदतीने अध्यापन कार्यात नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर दिपक भांगे यांनी सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या विविध शैक्षणिक साधने व स्काईप वापरुन अध्यापन रंजक केले आहे. गुरुजींना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. श्री दिपक भांगे यांना सलग दुसर्या वर्षी तर विशेष म्हणजे श्री महाले यांना जळगाव जिल्ह्यातून प्रथमच या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने टिचिंग केले जात आहे त्यासाठी मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांना एक वेगळी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे तरी सर्व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भूषण महाले यांनी केले.