Halloween party ideas 2015


कर्माला भक्तिची जोड द्या--महामंडलेश्वर हंसानदजी महाराज
कळमसरेत संत सावता महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम--

अमळनेर प्रतिनिधी

भगवदगीतेत कर्माला महत्व दिले आहे.मानवाने जीवन जगताना कर्माला महत्व देऊन कर्माला भक्तिची जोड दया म्हणजे जीवन सुखकर होईल.कर्मानेच प्रगतीची वाटचाल सुरु होतेअसे कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर  हंसानदजी महाराज यांनी काल ता.31 रोजी कळमसरे ता.अमळनेर येथे झालेल्या संत सावता महाराज पुण्यतिथी प्रसंगी प्रवचन करताना सांगितले.
          यावेळी  पहाटे श्रीराम मंदिरात पाच वाजता महाआरती करण्यात आली .सकाळी आठ ते साडेदहा वाजेपर्यंत संत सावता महाराज यांच्या पालखीची मिरवणूक सवाद्य गावात काढण्यात आली. यानंतर हंसानदजी महाराज यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात आरती करुण महाराजांचे प्रवचनाचा कार्यक्रम सम्प्पन्न झाला. मागिल आठवड्यापासून पूर्ण सप्तहा दररोज श्रीराम मन्दिरात भजनाचा कार्यक्रम होत होता.यावेळी श्रीराम भजनी मंडळ,संत मुक्ताबाई महिला भजनी मंडळ,संत मीराबाई भजनी मंडळ यांनी गावात अभंग म्हणित टाळ ,मृदुंग यावर ठेका धरित दिंडी काढली.याप्रसंगी परिसरातील नीम, शहापुर,खेडी, वासरे,पाडळसरे, गावातील भाविक उपस्थित होते.दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व माळी समाज बांधवानी सहकार्य केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.