Halloween party ideas 2015


अमळगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
       अमळगाव ता अमळनेर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आज आ शिरीष दादा चौधरी यांचा हस्ते संपन्न झाले
       कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गजानन महाराज व शनेश्वर देवस्थान जवळून झाली याठिकाणी आ शिरीष चौधरी यांचे सवाद्य जोरदार स्वागत करण्यात आले यानंतर झालेल्या कार्यक्रमात अमळगाव हे माझं गाव असून याच नाव खराब होऊ नये म्हणून गेली साडेचार वर्षे रात्रंदिवस मेहनत घेऊन अमळनेर तालुक्याचा विकास केला आहे असे सांगून गावाचा विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भूषण चौधरी यांनी केले तर आभार माजी जि प सदस्य गिरिश पाटील यांनी केले यावेळी सरपंच छायाबाई मोरे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील माजी सरपंच गजानन चौधरी , ललिता चौधरी, एकनाथ भिल ,सुनील भामरे , किरण गोसावी,नंदकिशोर पाटील ,हेमंत महाले , मनोज शिंगाने,विलास चौधरी ,दीपक पाटील ,चेतन भिल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
      यानंतर जि प केंद्रशाळा अमळगाव येथे संरक्षण भिंत 3 लाख , शादिखाना 10 लाख ,पारधी समाज मंदिर संरक्षण भिंत 3 लाख, आदिवासी समाज देवमढि 6लाख ,स्मशानभूमी 20 लाख या कामांचे भूमिपूजन आ शिरीष चौधरी यांचा हस्ते करण्यात आले तर आर ओ प्लांट चे लोकार्पण करण्यात आले.
      यानंतर उमेद फाउंडेशनच्या चा वतीने आदर्श विद्यालयात आ शिरीष  चौधरी यांचा हस्ते वृक्षारोपण मोहिमेस सुरवात करण्यात आली 
       कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सैन्यदलात कार्यरत असलेले उदय हिम्मतराव पाटील ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार , अरुण पाटील,राहुल पाटील , डॉ पंकज चौधरी, शब्बीर पिंजारी, बबलू पिंजारी,नितीन चौधरी ,रामा तेली ,निलेश हिम्मतराव पाटील , रत्नपाल मोरे, यांच्यासह उमेद फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते व युवकांनी परिश्रम घेतले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.