वृक्षरोपण बरोबर वृक्ष संवर्धन ही केले जाणार-
रणजित शिंदे
पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल युवकांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून संपूर्ण आर के नगर परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंरक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
उन्हाळ्याच्या सुटीत आर के नगर परिसरातील ओपन स्पेस व रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेत रोज सकाळी श्रमदान करून युवकांनी झाडे लावण्यासाठी खड्डे तयार केले होते. पाऊस पडताचअश्या खड्यांमध्ये आता वृक्षरोपणाला सुरवात करण्यात आली आहे. भगतसिंग मित्र मंडळाच्या युवकांनी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.या कार्यात लोकसहभाग मिळविण्यासाठी परिसरात घरोघरी फिरून लोकवर्गणी गोळा करण्यात आली आहे. तर विशेषत्वानेआदित्य बिल्डरचे प्रशांत निकम यांनीही उत्स्फूर्तपणे वृक्षसंवर्धनासाठी जाळीचे पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत. वृक्ष रोपणप्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन पंकजभाऊ मुंदडा,खांदेश शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष प्रदिप अग्रवाल, बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम,खानदेश शिक्षण मंडळ संचालक कल्याणबापू पाटील आदींच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संरक्षक पिंजरे लावण्यात आले. "वृक्षारोपण व संवर्धन नाच्या उपक्रमातुन परिसरातील वाढलेले तापमान काही अंशी नियंत्रित होईल , प्रदुर्षनावर मात करता येईल,विविध जातीच्या वृक्षांनी परिसर हिरवाईने सुशोभित होईल या उद्देशाने युवकांनी उपक्रम हाती घेतला आहे!" असे कार्यक्रमाचे प्रास्ताविकात रणजित शिंदे यांनी सांगितले.आभार युवकप्रमुख धिरज पाटील याने मानले.सूत्रसंचालन कल्पेश जगताप याने केले. अर्बन बँक चेअरमन झाल्याबद्दल पंकज मुंदडा तर खान्देश शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष झाल्याबद्दल प्रदिप अग्रवाल यांचा सत्कार स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला.यावेळी नगरसेवक राजेश पाटील, सुनिल वाणी, रावसाहेब सूर्यवंशी, मधुकर शिंपी आदि मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगतसिंग मित्र मंडळाचे धिरज पाटील, शेषनाथ बागुल ,अभिषेक पाटिल, प्रणव पवार, कल्पेश जगताप, महेश संदानशिव, कुणाल पाटील, दिपक पवार, किरण सूर्यवंशी,गणेश परदेशी, आदिं तरुण मित्रांनी प्रयत्न केले. तर मयूर बागल, विजया पाटील,मीनाताई पाटील ,जोशी मॅडम पिंटू जाधव, चंद्रशेखर ठाकूर, प्रा.स्वप्निल राणे,सुनिल पाटील,अहमद शेख,शुभम शिंपी,शुभम पाटिल,पंकज पाटील,आवणी पवार आदिनेही उपस्थित राहुन वृक्षारोपण कार्यात योगदान दिले तर कृ. उ.बा संचालक पराग पाटील यांचेही युवककार्यास सहकार्य लाभले.