कै.चि.नितीन चौधरीच्या पुण्यस्मरण निमित्ताने शारदा हायस्कूल मध्ये १८ वर्षांपासून नववीच्या विद्यार्थ्यांना वहया वाटपाचा स्तुत्य उपक्रम.
अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्ते व तेली समाजाचे जेष्ठ नेते रमेश चिंधा चौधरी यांचा चिरंजीव २२ वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. परीवारावर मोठे संकट कोसळले. इयत्ता नववीच्या वर्गातील हुषार, शांत ,मनमिळाऊ स्वभावाचा नितीन परमेश्वराने हिरावून घेतला.नितीनच्या आठवणी सदैव राहोत यासाठी रमेश आबा चौधरी व मुलगा इंजीनियर प्रमोद चौधरी गेल्या अठरा वर्षांपासून शारदा माध्यमिक विदयालय कळमसरे येथील नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वहया वाटपाचा कार्यक्रम कै.नितीनच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम नुकताच झाला.
चि.नितीन शाळेतील हुषार, शांत विद्यार्थी होता,त्याच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या अठरा वर्षांपासून वहया वाटपाचा कार्यक्रम अविरत सुरू आहे.आज आपल्यात नितीन जरी नसला त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील असे शारदा माध्यमिक व एन एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालय कळमसरे येथील प्राचार्य ए.ई.सोनवणे बोलत होते.
आज कै चि. नितिनभाऊ यांच्या २२ व्या पुण्यस्मरण निमित्ताने मागील १८ वर्षापासुन ९ वी च्या विद्यार्थांना वहयावाटपाचा अविरत सुरु असलेला उपक्रम.
शारदा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री ए ई सोनवणे सर, शिक्षक विकास महाजन,आर डि चौधरी,राजेश राठोड यांनी नितिनच्या आठवणींना उजाडा देवून श्रध्दाजंली अर्पण केली.
शारदा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री ए ई सोनवणे सर, शिक्षक विकास महाजन,आर डि चौधरी,राजेश राठोड यांनी नितिनच्या आठवणींना उजाडा देवून श्रध्दाजंली अर्पण केली.
संस्थेने श्री रमेश चिंधा चौधरी यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करून, आभार मानले. वह्यावाटप प्रसंगी शिक्षक वृंद, रमेश चौधरी,प्रथमेश चौधरी,ललित चौधरी उपस्थित होते.