Halloween party ideas 2015


गणवेश व शैक्षणिक साहित्याच्या अडचणीमुळे दुःख भोगावे लागु नये -मनवंतराव साळुंखे, राज्य आदर्श शिक्षक

अमळनेर प्रतिनिधी 

आज जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळा या ठिकाणी शाळेतील सर्व विदयार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, शुद्धलेखन प्रकल्पासाठी शैक्षणिक साहित्य वाटप, एक मुल एक झाड कार्यक्रमांर्तगत झाडांची रोपे वाटप असा तिहेरी कार्यक्रम घेण्यात आला.
धाबे ता पारोळा शाळेत सर्वच ५७ विदयार्थी आदिवासी भिल्ल समाजाची असल्याने त्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश शाळेकडुन वाटप करण्यात आले. शाळेची पटसंख्या ५७ आहे पण ४४ मुलांचे अनुदान प्राप्त झाले. १३ विदयार्थी या पासुन वंचित राहणार होते. ते नाराज झाले असते म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी वैयक्तीक स्तरावर ह्या विदयार्थ्यांनाही गणवेश उपलब्ध करुन दिले. तसेच मुलांचे भाषा विषयाचे लेखन सुधारावे त्यांना शुद्ध लेखनाचे नियम अवगत व्हावे म्हणुन शुध्दलेखन प्रकल्प अंतर्गत प्रत्येक विदयार्थ्याला दोनशे पेजेस दुरेघी लेखन वही व पेन वाटप केले. दोन गणवेश व वही, पेन मिळाल्यावर विदयार्थांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. गेल्या सात वर्षापासुन मुख्याध्यापक साळुंखे व वरीष्ठ शिक्षक पाटील हे शाळेवर एक झाड एक मुल हा उपक्रम राबवित आहेत. यात विद्यार्थी पालकांनाही सहभागी करुन त्यांना झाडांची रोपे वाटप केली जातात. यावर्षीही विद्यार्थी पटसंख्ये .इतकी ५७ झाडांची रोपे पालकांना टप्प्या टप्प्याने वाटप करण्यात आली. विदयार्थी व पालक त्यांचे त्यांच्या सोयीच्या व सुरक्षित जागेवर रोपण करुन जतन व संवर्धन करतात. आज पर्यंत अशी २४६ झाडे चांगल्या प्रकारे जगली आहेत.
यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल, पालक सुभाष ठाकरे, रविंद्र ठाकरे, सौ मनिषा भिल, रविंद्र भिल, सौ बेबाताई भिल उपस्थित होते. साळुंखे यांच्या पत्नी सौ चित्रा पाटील यांनी सर्व मुली व मुलांना आपल्या हाताने माप नुसार कपडे परिधान करून देवुन सहकार्य केले.
यावेळी मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले मागे जळगांव शहरात मुलीने शैक्षणिक साहित्य मागितले पालकांनी घेवुन दिले नाही म्हणुन तीने आत्महत्या केली. काल नाशिक जिल्हयात दोन भावांनी शाळेचे गणवेश वडीलांजवळ मागितले तर त्यांना विष दिले. कदाचित गरीबी व आर्थिक अडचणी मुळे असे प्रकार घडत आहे. अशी वेळ कुणावर येवु नये ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आम्ही गेल्या सात वर्षापासून विदयार्थ्यांना व पालकांना साधी पेन्सिलचा सुद्धा खर्च करु देत नाही. गरीब गरजु विदयार्थी व पालक असल्याने सर्वच गरजा आम्ही त्यांच्या पुर्ण करतो यातच समाधान व आनंद मिळतो.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.