शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांना यश.
धुळे प्रतिनिधी
शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांना यश...
पीपल्स स्पोर्ट्स एज्युकेशनल
अँड वेल्फेअर सोसायटी धुळे संचलित सना उर्दू प्राथमिक स्कूल आणि अल फातेमा उर्दू हायस्कूल,धुळे येथे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लतीफ देशमुख यांच्या संकल्पनेतून शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत आज वाटप करण्यात आली. धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असा हा स्तुत्य उपक्रम आदरणीय लतीफ देशमुख सर यांनी प्रथमच राबविला,त्यांनी दुय्यम सेवा पुस्तक अद्यावत करुन सदर कार्यक्रमात त्या प्रती वाटप करण्याचे ठरवले.जिल्ह्यातील इतर संस्थाचालक व प्राचार्य/मुख्याध्यापक यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साहाचे वातावरण या ठिकाणी दिसून आले. शिक्षक भारती संघटनेने मे महिन्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे साहेब यांना निवेदन दिले होते, त्यांनी 3 मे रोजी जिल्ह्यातील प्राचार्य/मुख्याध्यापक यांना दुय्यम सेवापुस्तक देण्यासंदर्भात आदेश दिले होते.सध्या वेतन शालार्थ प्रणाली मार्फत ऑनलाईन करण्यासाठी काम सुरू असल्याने पुढील महिन्यात सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल असे आश्वासन वेतन पथक अधिक्षक श्रीमती मिनाक्षी गिरी यांनी दिले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब देवराम पाटील, धुळे जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक बापूसाहेब संजयजी पवार, शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक अशपाक खाटीक, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे,दातार टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्रमुख लुकमान सर,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.