Halloween party ideas 2015


खान्देशच्या सुकन्या तथा आंतरराष्ट्रीय उद्योजिका डॉ.रेखा चौधरी “फिलॉसॉफी डॉक्टर” पदवीने सन्मानित*

भारतीय वेलनेस इंडस्ट्रीतल्या प्रथम डॉक्टरेट होण्याचा मिळाला मान..

अमळनेर प्रतिनिधी-खान्देश कन्या तथा आ.शिरीष चौधरी आणि हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांच्या भगिनी तसेच उद्योजक अरुण चौधरी यांच्या धर्मपत्नी आंतरराष्ट्रीय उद्योजिका डॉ रेखा अरुण चौधरी यांना सोरबोन विद्यापीठ फ्रांस तर्फे “फिलॉसॉफी डॉक्टर'पदवी प्रदान करून ऑनोरिस कोसा द्वारा सन्मानित करण्यात आले.
        सौदर्य व्यापारात विकास आल्यानंतर त्वचेसोबत नैसर्गिक सौंदर्य व वेलनेस यांची एक विशेष ओळख आहे.या संदर्भात एमडी-वनलाइन वेलनेस प्राइवेट लि. व क्वीन ऑफ दि स्पा व वेलनेस इंडस्ट्री ,नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या सोरबन इंटरनेशनल कन्वोकेशन मध्ये फिलॉसोफी डॉक्टर हॉनर कोसा पदवी डॉ रेखा चौधरी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. आई आईपीपीटी फांउडेशन इंडिया यांच्या संयोजनाने फ्रांसचे सोरबोन
विद्यापीठचे डॉ.जॉन थॉमस प्रेडे द्वारे आयोजित डॉ.रेखा चौधरी यांना कॉन्कलेव मध्ये “हेल्थ एंड
वेलनेस” या क्षेत्रात सन्मानित केले आहे. “वेलनेस' या क्षेत्रात डॉ रेखा चौधरी प्रथम भारतीय वेलनेस
महिला व्यक्तिमत्व आहे ज्यांना हा प्रतिष्ठीत सन्मान मिळालेला आहे.यावेळी एक अभ्यासू ग्लोबल वेलनेसस एंबेसेडर तथा आंतरराष्ट्रीय उद्योजिका डॉ.रेखा चौधरी यांनी आपल्या मनोगतातून
सांगितले कि, 15 वर्षापूर्वी जेव्हा मी शहरात सौंदर्याच्या क्षेत्रात आपले करिअर बनविण्यास आली होती
तेव्हा वेळ अत्यंत अवघड होती आणि जेव्हा मी स्पा आणि वेलनेस या क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा तर हे
क्षेत्र माझ्यासाठी अधिकच अवघड होते.तरी मी खुप कष्ट करत राहिली कारण मला माहित होते की, सहज यश प्राप्त होणार नाही. मला
माहित होते की, या मार्गात (क्षेत्रात) खुप कमी लोक यशस्वी होऊ शकतात. मला याची नेहमी जाणिव
होती की, या अवघड क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची गरज आहे. आणि हे मात्र
काही ठराविक लोकच करु शकतात. मी नशिबवान आहे की मी त्यातली एक आहे. वेलनेस इंडस्ट्री च्या संर्दभात माझी जिज्ञासूवृत्ती मुळे मला 
कुठल्या न कुठल्या 
गोष्टींनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर आगळी वेगळी ओळख मिळाली आहे, वेलनेस इंडस्ट्री मध्ये माझ्या भविष्यातील प्रत्येक विचारांचा नेहमीच आदर केला गेला आहे.
जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात मानसन्मान मिळण्यास सुरुवात झाली व माझे नाव प्रतिष्ठेस येण्यास
सुरवात झाली तेव्हा मी गावातील मुलांसाठी वेलनेस इंडस्ट्री अभ्यासासाठी कार्य करण्यास सुरुवात केली.मी आज अत्यंत आनंदीत आहे की मी आदिवासी व गावातील मुलांच्या जीवनात यशस्वीरित्या बदल
घडवून आणण्यास यशस्वी झाले आहे,असे सांगत मी खुप आनंदित आहे की मला पुरस्कार
विजेता युरोपीय बॉन्ड स्किनकेयर आणि स्पा (SPA) ब्रांड सारख्या रेमीलॉर (Remy loure France)
फाइटोमेर (Phytomer France), एएसपी (ASP) आणि बीलब (BLAB Italy) सोबत सामील
होण्यासाठी व कार्य करण्यासाठी संधी मिळाली.मागील काही वर्षात वेलनेस इंडस्ट्रीचे काम करण्यासाठी जगातील प्रतिष्ठीत संघटनांकडून पण
मला सन्मानित करण्यात आले आहे. संपूर्ण जगात उच्च व लक्झरी स्पा ची स्थापना करण्यासाठी किंवा जुहू मध्ये आपले लोकप्रिय करेसा डे स्पा सुरु करण्यापासून तर जियो थर्मो थेरेपी आणि रोप मसाज थेरेपी सारख्या विविध प्रकार (पेटेंट) करण्यापासून त्यांचे हे सर्व ऑकटिवीज ने वेलनेस इंडस्ट्री मध्ये आपल एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आम्ही आमच्या विविध गावातील शाळेत, ग्रामीण क्षेत्रातील लहान गावांतील युवकांना सौंदर्य आणि वेलनेस इंडस्ट्री मध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षित करुन शहरात त्यांना स्पा आणि सैलून मध्ये नोकरी (रोजगार) देवून यशस्वीपणे त्यांच्या जीवनात एक आगळा-वेगळा बदल
निर्माण केला. सर्व उपक्रम हिच त्यांच्या यशाचे कारण आहेत.
ग्लोबल वेलनेस डे, विश्व कल्याण सप्ताह आणि भारतामध्ये विश्व डिजिटल डिटॉक्स दिवस
स्थापन करुन लाखों लोकांपर्यंत ते पोहचविण्याचे काम त्यांनी व त्यांच्या उत्साही कर्मचारी सोबत केले
आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला वेलनेस उदयोगामध्ये त्यांना खूप यशस्वी केले आहे.
            फ्रांसचे सोरबोन विद्यापीठाचे डॉ.जॉन थॉमस प्रेड यांचे आभार त्यांनी मानले. डॉ.रेखा अरुण चौधरी या तेली समाज महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.श्री.हिरालाल काका चौधरी यांच्या सुकन्या आहेत.सदर बहुमानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.