अनोरे ग्रामस्थांनी जलपूजन करून तहसीलदार ज्योती देवरेसह व्यक्त केला आनंद.
अमळनेर प्रतिनिधी- बऱ्याच दिवसानंतर वरुणराजाच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंतेत होता काल संध्याकाळी वरूण राजाने पावसाची चांगली हजेरी लावली काही भागात चांगला पाऊस पडला त्यामुळे शेतकरी राजा सुखावला. गेल्या तीन ते चार वर्षापासून अमळनेर तालुका दुष्काळाच्या छायेत होता. प्राणी पक्षी यांची पाण्यासाठी फारच घालमेल होत होती पण कालच्या पावसाने काही भागात नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत अमळनेर तालुक्यातील अनोरे गावात वरून राजा चांगला बरसल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाला पावसाचे जल पूजन करून स्वागत केले.यावेळी अमळनेर तालुक्याच्या कार्यक्षम तहसीलदार ज्योती देवरे उपस्थित असल्याने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
तीव्र दुष्काळी अनोरे गावाने गेल्या ४ वर्षांपासुन पशुप्क्ष्यांसाठी सुद्धा पाणी पाहीलेले नव्हते.. मात्र या वर्षी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन त्यांनी पाणी अडविण्यासाठी वेगवेगगळे बंधारे बांधले..
सुदैवाने काल दमदार पाऊस झाला आणी गावात जणु पाण्याचे तुफान साचले..
जलपुजन करुन गावकर्यानी आज पाण्याचा आनंदोत्सव साजरा केला.
तालुक्यात श्रमदानासाठी आमदार, माजी आमदार, नगराध्यक्षा,जिप सदस्य, प.स.सदस्य,जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार,गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी,गावातील नागरिक महीला, पत्रकार, अधिकारी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गावातील श्रमदानासाठी मेहनत घेतली होती व त्यांची मेहनत वाया गेली नाही वरूणराजा चांगल्या बरसल्याने नाले तुडुंब वाहतांना दिसत आहे याच्या सारखा मोठा आनंद कोणता नसेल.