श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्काराचे पाचव्या वर्षात पदार्पण के एस माळी अध्यक्ष सांगोला अर्बन बॅँक सांगोला सोलापूर
सोलापूर प्रतिनिधी
माळी समाजाचे दैवत असलेले श्रीसंत सावता महाराज समधीस्थळी अखिल भारतीय माळी समाजातील सर्वोच्च व्यक्तीस श्रीसंत सावता महाराज पुरस्काराने 2015 पासून कार्यक्रमास प्रारंभ झाला ह्यावर्षी आपण पाचव्या वर्षात पदार्पण करत आहोत त्यानिमित्ताने घेतलेला वेध ।।।।
आजपर्यत समाजातील मा छगनरावजी भुजबळसो 2015 मा सुधाकरभाऊ गनगणे 2016 मा गो रा खेरनार 2016 आणि मा
अशोकरावजी मानकर व प्रगतीताई मानकर दांपत्य 2018 अशी मान्यवरांना सन्मानित करण्यात त्यामुळे समाज संघटन होऊ लागला आहे
सामाजिक दृष्टिकोन खरे काम करणाऱ्या 150 राजकीय सामाजिक सांस्कृतिक,उद्योग व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनाही सन्मानित करून त्याव्यक्ती समाजापुढे राज्यपातळीवर येऊन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळाले
अनेक कुटूंबीय कार्यक्रमस्थळी भेटी देऊ लागल्याने समाजाचा अरण येथे प्रवाहात वाढ होत आहे
त्याकुटूंबतील भावीपिढी दरवर्षी अरण येथे येऊ लागली
महिलांची संख्या दुप्पट वेगाने अरण सावता महाराज चरणी दर्शनास येत आहेत
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांचा पुरस्कारात समावेश करत असल्याने त्याभागात जागृती होऊन वृत्तपत्रात बातम्या,व नंतर सत्कार सोहळे होऊ लागल्याने माळी समाजाची जागृती प्रबोधन आणि संघटन कार्यास गती येऊन खरी काम करणारी व्यक्ती पुढे येऊ लागली
श्रीसंत सावता महाराज चरणी दर्शनास समाजाचा प्रवाह वाढत असल्याने तेथील संस्थेस मदत मिळून समाज कार्यास गती मिळू लागली उदा अन्न दान मंडळ
समाजापुढे आदर्श मंडळी दिसू लागली आणि त्याचा उत्साह वाढून समाज कार्यास गती मिळत आहेत
इतर समाजाच्या शक्तीस्थळाप्रमा
ने माळी समाजाचे शक्तीस्थळी समाज संघटित होत आहे
अनेक गावांत मंदिरे भजनी मंडळी, भावीपिढी वारकरी संप्रदायातील प्रवाह वाढत आहे
अनेक कुटूंब आई,वडील मुलगा मुली सह शक्तीस्थळी येऊ लागल्याने लोक गावात जाऊन प्रचार करत असल्याने दुसरे कुटूंब वाढू लागली आहेत
उदा दीपक कुदळे,किरण झोडगे,बाजीराव तिडके के एस माळी रविकाका बोरावके अशोकजी मानकर,राजेंद्रजी आंडे रामदासजी डोके कुंडलिक चौधरी दशरथ कुळधरण युवा पिढीत डी महाजन शरद मंडलिक,राजेंद्रजी महाडोळे रावसाहेब अंभोरे इ लोक पुढे नेतृत्वासाठी पुढे येत आहेत
एकंदरीत मा दशरथ कुळधरण यांनी प्रथम सुरू केलेला श्री संत सावता महाराज समाजभूषण सोहळा आज सामुदायिक माळी समाजाचा कार्यक्रम म्हणून पुढे येत असून त्यातून सामाजिक लोकांच्या मदतीने संघटन कार्यास प्रोत्साहन मिळत असून समाज जागृती होत असून संघटन दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही तेव्हा श्रीसंत सावता महाराज समाजभूषण कार्यक्रमास आम्ही प्रयोजकपद देऊन समाज संघटनसाठी प्रोत्साहन देत असल्याने सांगोला बॅँकेच्या चेअरमन के एस माळी सर यांनी स्पष्ट केले असल्याचे सांगितलेत