पहिल्या पावसात उन्मलून पडलेला विद्युत खांब वीस दिवसानंतर पडूनच ; महावितरणचे शेतकरयांची तक्रारीकडे दुर्लक्ष-----
अमळनेर प्रतिनिधी
पहिल्याच वादळी पावसाने वीस दिवसापूर्वी विद्युत खांब जमिनीवर आडवा पडला असून शेतकरींनी तक्रार करूनही महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरींनी केला असून याच आडब्या पडलेल्या खांबावरील तारांमधुन विजप्रवाहाने जीवीतहानी होऊ शकते.यासाठी महावितरण कंपनीने वेळीच लक्ष घालून आडवा पडलेला खांब त्वरीत उभा करावा अशी मागणी शेतकरींनी केली आहे.
मागील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार वादळी पाऊस देवळी शिवारात झाला होता.यामुळे याभागात बरीच नुकसानही झाले होते.परिणामी घरांचे पत्रे ,झाडे ,विजखांब यावेळी उन्मलुन पडले होते.या घटनेला जवळपास पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस होउन्ही जमिनीवर आडवे पडलेले खांब शेतात तसेच पडलेले असून देवळी रसत्यावरिल धनगर डी पी जवलील सुका माणिक कंखरे यांच्या शेतात विजखांब हा आडवा पडल्याचे विज वितरण कंपनीचे संभधीत कर्मचारी यांना कळवूनही जबाबदारी झटकट आहेत. याबाबत तेथील परिसरातील शेतकरी भिका महादु लांडगे यांनी विज कंपनीचे शाखा अभियंता यांच्याकडे लागलीच लेखी तक्रार दिली होती. ही तक्रारही दुर्लक्षित झाल्यानंतर पुन्हा 3 जुलाई रोजी पुन्हा लेखी तक्रार दिली असूनही अजुन त्याबाबत दखल घेतली नाही. श्री लांडगे यांनी याच परिसरातील शेतात सहा एकर शेतात ठीबक च्या सहायाने लागवड केली आहे.तर येथील भागातील गुरे ढोराना पाण्याची सोय होत नसल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत अजुन विजवितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे शेतकरीं वेठीस धरले जात असून होणाऱ्या नुकसानीला ही महावितरण जबाबदार राहतील अशीही संतप्त प्रतिक्रिया शेतकरिणी दिल्या आहेत.
छाया-देवळी ता.अमळनेर -येथील शेत शिवारात उणमलुन पडलेला विज खांम्ब
ईश्वर महाजन अमळनेर