18 जून पासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलेले शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने मी आणि माझे 385 शिक्षक बांधव आणि भगिनी आमरण उपोषणाला बसलो
आंदोलन माझ्या एकटी मुळे पूर्णत्वास गेलं नाही तर हजारो शिक्षक सोबत होते म्हणून शासनाला प्रथमच या विषयाबद्दल विचार करण्याची वेळ आली
आज पर्यंत जे शक्य नव्हतं त्याला मार्ग मिळाला,या मार्गाचा पाठपुरावा केला तर नक्कीच आपल्या विषयाला यश मिळेल,शासनाने समिती गठित करू व GPF बद्दल चे पत्र त्वरित रद्द करू असे सांगितले
आज मा शिक्षक आमदार सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी दिल्ली मध्ये गेले,आदरणीय नारायणे सरांना फोन आला व सुप्रीम कोर्टात आपण जाऊ अशी माहिती दिली,परंतु सर्व शिक्षक बांधवांना मी विनंती करते घाई करू नका,थोडा वेळ शासनाला देऊ,कालच अधिवेशन संपल,शिक्षक आमदार महोदय यांचे म्हणणे त्यांच्या दृष्टीने बरोबर असेलही परंतु सुप्रीम कोर्टात जायची ही वेळ नाही,जर या महिन्यात शासनाने काहीच पाऊल उचलले नाही तर सर्व मिळून पुढील निर्णय घेऊ,परंतु तूर्तास थांबु,मनातील गोंधळ थांबवा आणि विश्वास ठेवा नाहीतर आता घाई केली तर शासनाला "आयतेच कोलीत हातात द्याल",मग शासन म्हणतील कशाला कोर्टात गेले मग हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे जो पर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तो पर्यंत आम्ही हतबल आहोत,नंतर कुणीही काहीच करू शकणार नाही
कृपया या मॅसेज चा गैरसमज न करता सर्व पेन्शन ग्रस्त बांधव बाव भगिनींना पाठवा
धन्यवाद
तुमचीच बहीण
संगीताताई शिंदे