Halloween party ideas 2015

कर्तव्यपरायण  केंद्र प्रमुख  गोकूळआबा पाटील
अमळनेर प्रतिनिधी

मी गोकुळ आनंदा पाटील 
एक सामान्य जि.प.कर्मचारी(केंद्रप्रमुख)
म्हणून जुन१९८२ पासुन सेवेची सुरुवात उल्हासनगर येथील शारदा विद्या मंदिरात केली.
      डिसेंबर१९८२ला जि.प.ठाणे अंतर्गत जव्हार तालुक्यातील टोकरखांड येथे
रूजू होउन शाळा सुरु केली.
     १२मार्च१९८४ला जळगाव जि.प.च्या सार्वे तांडा शाळेत हजर झालो.
जुन १९८५पासुन अमळनेर
तालुक्यातील टाकरखेडा येथे४५६ पटसंख्या व १४ शिक्षकसंख्या असलेल्या शाळेत हजर झालो.जवळजवळ १३ वर्षे तेथें कार्यरत होतो नंतर चिमणपुरी -पिंपळे येथे बदली झाली. तेथेही जवळजवळ १३वर्षे  उपशिक्षक व पदविधर शिक्षक म्हणून कार्यरत होतो.
   १.०२.२०१०रोजी गडखांब 
येथे केंद्रप्रमुख म्हणून हजर झालो.व नियत वयोमानानुसार वयाची५८वर्षे पुर्ण झाल्याने ३१.०५.२०१९रोजी यशस्वी सेवानिवृत्त झालो.
 अशा या स्वप्नवत प्रवासात अनेक  गुरूवत,आदर्शव्यक्ती,विचार वंत व सल्लागार व्यक्ती
भेटल्या .त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदोदित कामाशी ईमान राखून माझी
सेवा यशस्वी पार पडली.
      यात काही कडू गोड अनुभव आलेत.त्यातुन आपल्या बुद्धिनुसार योग्य विचार पुर्वक निर्णय घेतले. प्रसंगी चांगल्या व्यक्ती व कामासाठी वाईट व्हावे लागले तरीही तमा बाळगली नाही.
        चांगल्या माणसांसाठी तन,मन,धनाने मदतीचा हात दिला. शक्य असेल तर निश्चितच सहकार्य केले,करत राहिन.
       तरीही काही झारीतिल शुक्राचार्य त्रासदायक ठरु पहात,तर प्रसंगी कठोरपणे
वागलो असेन.परंतु न्याय व नीतिमत्ता शाबूत ठेउनच क्रुती
केली.आपल्या कार्यावर विश्वास ठेऊन कर्मयोगी झालो.असं म्हणतात कि,ज्या शिक्षकाचे कर्म चांगले असेल तरच त्याची पिढीहि चांगली राहिल.
   आईवडिलांना देवस्थानी स्मरुन ,त्यांच्या उत्तम शिकवणुक व संस्कारांमुळे-
      कोणाकडून जेवणाच्या पार्ट्या, कपडे,उसनवारी च्या नावाने सहा/सहा महीने हजारो रूपये वापरायला अशी कोणाकडे छदामाचीही
अपेक्षा केली नाही. स्वतः चे घरूनच नाश्ता-पाणी करून
सोबत प्रसंगी पाण्याच्या २/२बाटल्या घेउन नियमित फिरत होतो.
     गरीब विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणासाठी नियमित भेटी देऊन शिक्षण क्षेत्रात पवित्र 
व निकोप कार्यासाठी आग्रही राहिलो.प्रसंगी कोणी कुभांड करून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला असेल-त्या वेळी
लुंगे-सुंगे,द्वेष्टे ,भिकार व्रुत्तींनी
त्यांच्या आडून शिखंडीच्या व्रुत्ती ने सहकार्य केले तरीही
आपल्या व्रुत्तीत व क्रूतीत तसूभरही फरक पडु दिला नाही.
   प्रसंगी शिक्षकांसाठी /मुख्याध्यापकांसाठी,व शिक्षणक्षेत्रातील त्रूटी दुर करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेत.शिक्षणात मुरलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रसंगी धिरगंभिरपणे एकांड्या शिलेदार म्हणून लढलो.असो.
     तरीही आयुष्याच्या ऊत्तरार्धाच्या उंबरठ्यावर या सर्व भावनांचा परिस्फोट व्हायला नको पण झाला.
   सेवानिवृत्तीच्या या नाजुक वळणावर अखेरच्या टप्प्यात केंद्रप्रमुख पदाच्या काळात खुप शिकायला, अनुभवायला मिळाले.
    कौटुंबिक,पारीवारीक सांसारिक ,शैक्षणिक,व जिवाभावाचे मित्रांकडून भरीव सहकार्य मिळाले.
तसेच काही विघ्नसंतोषी किंवा काहिही देणेघेणे नसतांना साताजन्माच्या वैरी सारख्या नतद्रष्टांचाहि खुपच
भ्रमनिरास झाला असेल ,तरीही त्यांच्या क्रुती व प्रव्रुत्ती तून माणसे वाचायला ,शिकायला मिळाले.
    १जूनच्या निरोपसमारंभाच्या कार्यक्रमास ज्या प्रेमी जनांना अपरिहार्य कारणांमुळे येता आले नाहीत .ते अजुनही घरी
रा.ना.बापूंकडे येउन प्रेमाने, सह्रुदयतेने निरोपा प्रित्यर्थ सत्कार करतात.मन क्रुतार्थ भावनेने भरुन येते.(उदा.खंडेराय आबा,नगाव माध्यमिक स्टाफ,आश्रम शाळा स्टाफ,संजय शिंदे सर,सोमनाथ विसपुते सर,
श्री व सौ.छाया सोनवणे मँडम ई.)
     थोडक्यात शैक्षणिक क्षेत्रात एक साहसी,कठोर, वादळी,व चांगल्या साठी हट्टी असे व्यक्तीमत्व असुनही ९५% खुपच चांगले लोक माझ्या सहवासात आलेत.त्यांच्या सहवासात माझे आरोग्य व
परीस्थिती उत्तमोत्तम राहिली.
५%वाईट,कटु,विघ्नसंतोषी,
दुसऱ्याचे चांगले न बघवणारे
(जे स्वतः चेही चांगले करू शकत नाहीत. कोणाचे पाहू शकत नाहीत)अशाकडे कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता दुर्लक्ष केलेलेच
चांगले.
आप्त स्वकियांसाठी सदैव तत्पर व नतद्रष्टांपासून सदैव दुर.
        .        आपलाच
       गोकुळ आनंदा पाटील

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.