Halloween party ideas 2015


स्व.सौ.पी.एन.मुंदडा विद्यालयात योग दिन साजरा....

अमळनेर प्रतिनिधी

       अमळनेर येथील स्व.सौ.पी.एन. मुंदडा विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला त्या निमित्ताने विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एस.विंचूरकर सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा पतंजली योग प्रचारक श्री.कमलेश आर्य होते. 

     कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने झाली. त्या नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री. पी.एस.विंचूरकर सर यांनी केले. तसेच योग दिनी जन्मदिवस असणारे विद्यार्थ्यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

       यावेळी योग प्रचारक श्री.कमलेश आर्य यांनी विद्यालयात योगासने व प्राणायाम करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून करून घेतली. तसेच विद्यार्थ्यांना सविस्तरपणे योगासने व प्राणायाम यांच्या विषयी माहिती देखील दिली. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. किर्ती सोनार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती.वंदना पाटील मॅडम यांनी केले. 

        कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम् ने करण्यात आला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.