Halloween party ideas 2015


तहसीलदारांच्या अपमानास्पद वागणुकीबद्दल  व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याबद्दल तात्काळ कारवाई करा.

जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील यांनी दिले उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन.

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी अपमानास्पद वागणुक दिली व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आज उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे यांना निवेदन देण्यात आले.

        निवेदनात असे म्हटले आहे की सारबेटे ता.अमळनेर येथील शेतकरी कष्टकरी दि.१९/०६/२०१९ रोजी सुमारे सकाळी - ११.०० वा. माझ्याकडे तक्रार घेवुन आले होते. त्यावेळेस मी माझ्या

निवासस्थानामधुन मा.तहसिलदार (सौ.ज्योती देवरे) यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केला होता. पण

त्यांनी माझा फोन उचलण्यास टाळाटाळ केली. फोन करण्याचे कारण एक जबाबदार जि.प.सदस्य(कळमसरे-जळोद गट) असून शेतक-यांचे जिवणाशी निगडीत शंकाचे, अडचणींचे निर्मुलन करणे एकलोकप्रतिनिधी या नात्याने माझे अद्यकर्तव्य होते. त्या कारणे मी फोन न उचलल्यामुळे तात्काळ

तहसिल आवार गाठत तसिलदार यांच्या दालनात जाऊन त्यांना संबंधीत शेतक-यांचे दुष्काळ निवारण्याचा निधीचे दस्तावेज, चेक आपल्या टेबलावर १४ ते १५ दिवसापासून जेसेथे त्या परिस्थत असल्या करणेआपण त्यावर सहया का करत नाही या विषयची विचारणा केली असता मा.तहसिलदार यांनी बसल्या

जागेवरुन खड्या आवाजात ठेकासत मलाच प्रतिप्रश्न विचारला तु कोण आली गं, मला प्रश्न विचारणारी? माझ्या परवानगी शिवाय तु आत आलीच कशी ? त्यावर मी त्यांना त्यांच्या दालनात येण्याचे सबळ कारण सांगितले. तसेच मी एक जबाबदार पदाधिकारी आहे, असे सांगताच मा.तहसिलदार यांनी मला

उध्दटपणे सांगितले की, तुझ्या पदा पेक्षा माझे पद खुप मोठे आहे. तुला मला शिकविण्याचे काही कारण नाही. मी पाहिजे तेव्हा सहया करेल. माझा मालक कोणीही नाही. तु माझे मालक बनु नको. आणि या पुढे माझ्या प्रायव्हेट फोनवर फोन करायचा नाही. ही माझी प्रायव्हेट प्रापर्टी आहे. यावर मी त्यांना प्रश्न विचारला की, मग सरकारी फोन कुठे आहे ? त्याचा नंबर जनतेला कळविलेला आहे का ? यावर ते निरुत्तर झाले व उलट दर्शी माझीच व्हिडीओ शुटींग काढणे त्यांनी सुरु केले. तसेच त्यांनी अशा

पध्दतीचे वागुनक दाखवुन माझ्यावरच शासकीय कामात अढथळा आणण्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी प्रचंड प्रशासकीय दादागिरी त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. यावरुनच मा.तहसिलदार या किती खुनशी वृत्तीच्या आहेत हेच आमच्या निदर्शनात आले. असे वागणुक त्यांनी एका लोक

प्रतिनधीचे तसेच लोकशाहीची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तसेच मला आलेला अनुभव हा अमळनेर तालुक्याच्या शेतकरी कष्टकरी बांधवांसाठी नविन नाही. तसेच अशा पध्दतीने मा.तहसिलदार, जनतेशी, जबाबदार पदाधिक-यांशी वागत असणार तर येणा-या काळात मा.तहसिलदार यांच्याकडून नागरीकांवर वा पदाधिका-यांवर शासकीय कामात अडथळा

आणण्याचा गुन्हा हा १००% दाखल होवु शकतो. याची मला खात्री आहे. म्हणून अशा दबंग अधिका-यावर १५ दिवसाच्या आत शासकीय कारवाई न केल्यास आपल्या कार्यालयाच्या आवारात

आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबनार. त्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास शासन व प्रशासन सारासर जबाबदार राहणार याची कृपया नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर मुक्तार खाटीक शहराध्यक्ष,प.स सदस्य निवृत्ती बागुल, प्रविण पाटील,दिपक पाटील, गौरव पाटील, सौ योजना पाटील, आशाताई चावरीया ,अलका पवार, देविदास देसले दर्पण वाघ ,बटू पाटील ,प्रदीप पाटील राहुल पाटील ,श्याम पाटील, दिनेश कोठारी यांच्या पत्रकावर सह्या आहेत.                                

     चौकट                        

याबाबत तहसीलदार ज्योती देवरे त्यांनी सांगितले की, कार्यलयात पंतप्रधान किसानयोजनेच्या बाबत तालुका कृषी अधिकारी वारे, सहायक गटविकास अधिकारी वायळ व कर्मचारी यांच्या सोबतमहत्वाची बैठक चालू असताना जयश्री पाटील या परवानगीन घेता जोरात दरवाजा उघडून आत आल्या व माझीनिर्भस्तना होईल अशा शब्दात जोर जोरात बोलून माझ्यापदाला अपमानास्पद वागणूक देऊन शासकीय कामकाजातअडथळा निर्माण केला, त्यांना वारंवार शांत राहून अडचणमांडण्याचे सांगून सुद्धा मोठ्या आवाजात बोलत कार्यलयाचादरवाजा जोरात बंद करून निघून गेले, त्यामुळे मी त्यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केलाम्हणून भादवी कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ज्योती देवरे

तहसीलदार अमळनेर                                

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.