देवगाव देवळी हायस्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी- देवगांव येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये २१ जुन हा दिवस जागतिक योगदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे क्रिंडा शिक्षक अरविंद सोनटक्के होते.योगदिनानिमित्त शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी सांगितले कि योगामुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक समाधान मिळते असे सांगितले.
शाळेत योग दिनानिमित्त विविध रोगांचे प्रकार प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर शाळेचे क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी करून दाखवले जागतिक योगदिन निमित्त संपूर्ण देशात आज योगदिन साजरा केला जात आहे या योगामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून सवय लागावी हा शासनाचा चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी नियमित योगा केल्यास विविध प्रकारच्या आजारापासून आपले संरक्षण होऊ शकते व आपले शरीर सुदृढ होऊ शकते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक आय. आर .महाजन यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक एस के महाजन लिपिक एन जी देशमुख संभाजी पाटील गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.