विद्याथ्यांचे गुणवत्तासाठी शिक्षकांची चिकाटी महत्वपूर्ण--छायाबाई पाटील
अमळनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवायची असेल तर शिक्षकांची चिकाटी महत्वपूर्ण आहे.सर्वत्र इंग्लिश मीडियमचे फैड आल्याने पालकवर्गात द्विधा मनस्थिति निर्माण झाली आहे. याप्रकारे विद्यार्थ्यांचे यशस्वी वाटचाल सुरु राहिल्यास नक्कीच जिल्हा परिषद शाळेला पुन्हा सुगीचे दिवस येतील.शासनाने जिल्हा परिषद शाळाना विविध अशा शैक्षणिक सोयी उपलब्ध करुण दिल्याने गुणवत्ता वाढू लागली आहे.असे प्रतिपादन पारोला पंचायत समितीच्या सभापती छायाबाई पाटील यांनी पिम्पलकोठे ता.पारोला येथील जिल्हा परिषद शालेतील तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिलविले त्यावेळी त्यांचा सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.
पिम्पलकोठे जिल्हा परिषद शालेतील इयत्ता पाचवीतील तुषार मोतीलाल पाटील हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आठवा तर पारोला तालुक्यात 3 रा आला. ओम सन्तोष पाटील हा तालुका यादीत सहावा तर नन्दिनी विजय पाटील ही विद्यार्थ्यांनी 21 वी आली.या विद्याथ्याना मुख्याध्यापक दीपक पाटील, वर्गशिक्षक संदीप सोनवणे, प्रेमराज विसावे,श्रीमती संगीता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसगी विद्यार्थ्याना।शैक्षणिक साहित्य देऊन गौरविन्यात आले.
...यावेळी कार्यक्रमाला वैशाली पाटील, ग्रामसेवक सुनील पाटिल, ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
छाया--पिम्पलकोठे ता.पारोला -शिष्यवृत्ति परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्याथ्यांचा सत्कार करतना छायाबाई पाटील आदी.