Halloween party ideas 2015


आठवण खाकी वर्दीतील देवमाणसाच्या कर्तुत्वान कामाची------- 

नाशिक प्रतिनिधी

       शेतकऱ्याच्या मदतीसाठी खाकीतला माणूस जागा ---- गिरीश पाटील सर ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक )


              मित्रांनो आपल्याला माहीत च़ आहे कि गणेशोत्सव राहिला कि नंदुरबारात किती गुलालाचा उधळभेक होते , हे थांबवण्यासाठी गिरीश दादांनी नंदुरबार शहरात उत्कृष्ट संकल्पना मांडली होती व मागच्या वर्षी ती सक्सेस केली होती ----

       राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असल्याने शहरातील नंदुरबार शहरातील 74   पैकि दोन गणेश मंडळाच्या अध्यक्षानी गुलालाची उधळण न करता गुलालाच्या पैशातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला .तर 20 गणेश मंडळानी अत्यल्प गुलाल उधळण्याचा संकल्प करतं बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त भागाला देण्याचे मान्य केले आहे.

     त्यामुळे गुन्हे अन्वेषन विभाग व शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसापासून करण्यात आलेल्या प्रबोधनला बऱ्यापैकी यश मिळाल्याने पोलिसांना समाधान मिळाले .

       यंदा राज्यात भीषण दुष्काळाचे संकट आहे .अभिनेता नाना पाटेकर मकरंद अनसपुरे यांनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष निधीचे वाटप केले .यांची जाणीव थेट पोलिसांचा ह्यदयाला भिडली त्यांचातील खाकीतला माणूस जागा झाल्याने त्यानेही नानांचा पाउलावर पाऊल ठेवत जनजागृती करण्याचे निर्णय घेतला .

      मित्रांनो गुलालाचा बचत झालेला पैसा कुठलाही सामाजिक कार्याला लावण्यात असल्याने या मंडळाच्या अध्यक्षानी पोलिस विभागाला सांगितले तसेच अन्य मंडळे कार्यकर्ते गुलाल उधळण्यावर काही प्रमाणात आवर घालनार आहे ...

    त्यामुळे अधिक रक्कम बचत होणार आहे -----

      मित्रांनो गिरीश दादांचा मार्गदर्शनाने नंदुरबारात गणेश मंडळाच्या चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला होता --------

         30 गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याच्या बैठक घेतल्या त्यातून चांगला प्रतिसाद मिळाला .जिल्हा पोलीस प्रमूख महेश धुर्वे यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हातील पोलीसानी मंडळाच्या वारंवार बैठका घेतल्या .या बैठकीतून सामजिकतेचे भान आणून देण्यात आले .

      गुलालच्या बचतीचे पैसे योग्य कामासाठी वापरण्यात येतील.

शब्दांकन

समाधान पाटील

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.