Halloween party ideas 2015




ओबीसीचे आक्रमक नेतृत्व
माळी समाजाचा बुलंद  आवाज अँड  राजेन्द्रभाऊ महाडोळे यांचाअमरावती जिल्हा च्या विविध सामाजिक संघटने तर्फे सत्कार,
अमळनेर प्रतिनिधी
विजयाच्या हक्काचा खरा, सत्काराचा मानकरी....... 
अँड राजेन्द्रभाऊ महाडोळे यांनी अनेक वर्षा पासून चालू असलेली राजकीय लाचारी व विशिष्ट समूहाची राजकीय मक्तेदारी समपुष्टात आणण्यासाठी व समाजाला राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी जे राजकीय जनआंदोलन अँड. राजेंद्र भाऊ महाडोळे यांनी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी सुरु केले. हे अनेक मात्तबर राजकारण्यांना  सुद्धा लाजविण्यासारखे आहे. माळी समाजाचा राजकीय  सन्मान  कसा वाढवू शकतो, माळी समाज राजकीय कसा दाखल पात्र होईल, याची रणनीती अँड. राजेंद्र महाडोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार करून राजकीय सन्मान प्राप्त करण्यासाठी ही लढाई सुरू केली ही लढाई चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून सुरू करून जन आंदोलनाच्या माध्यमातून चांगला प्रयोग करून दाखविला हा समाजासमोर आदर्श प्रयोग आहे, समाज सोबत असला तर पैशाविना निवडणुका कशा लढवता येऊ शकतात, कार्यकर्ता प्रशिक्षण, च्या माध्यमातून हजारो कार्यकर्ता उपाशीतापाशी राजकीय विजयासाठी कसा तुटून पडु शकतो, गावागावातून लोकवर्गणी कशी गोळा होऊ शकते, व सत्ता धाऱ्याना कशी धूळ चारता येते व त्या जिंकता पण येऊ शकतात हे दाखवून दिले, एवढेच नाही तर समाजाचा स्वाभिमान वाढवला, समाजामध्ये राजकीय  जागृती  आणली. समाजाला राजकीय दखल पात्र म्हणून विजयाच्या उंबरठ्यावर उभा केला. समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अशा *लढवय्या सेनापतीचा सत्कार* समाजाने केला पाहिजे, आणि म्हणून अमरावती जिल्ह्यात दि. 23 जून 19 रोजी माळी समाज व अनेक विविध  सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ऍड.  राजेंद्र महाडोळे यांचा सत्कार घेण्यात आला,या सत्कार सोहळा चे अध्यक्ष म्हणून मा.प्रमोद भाऊ सोनार व प्रमुख अतिथी विठ्ठलराव नागतोडे हे होते. सत्कार प्रामुख्याने प्रवीणभाऊ पेठकर, मनोजभाऊ अंबाडकर, संजय अंबाडकर, अक्षय नाल्हे, प्रवीण लडके, प्रा. रूपेश फसाटे एड.  श्रीकांत नागरीकर, नानाभाऊ आमले श्रीनाथ वानखेडे संजय वाघुळे सौ सविता पेटकर प्रशांत पाटील, सुरेश  खंडाळकर, अमोल हाडोळे, भूषण वानखडे,  धीरज पाटील, प्रफुल्ल वानखडे, मधुर जाधव, यांनी आयोजित केला होता.  ,  चला समाजाची राजकीय.......शक्ती एकत्र लढण्यासाठी, समाजाने एकत्र आले पाहिजे........ असे आव्हान सुद्धा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.