शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनच्या जुनी पेंशन संदर्भातआझाद मैदानावरील उपोषणाची शासनाने घेतली दखल.
जुनी पेंशन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगिताताई शिंदे व पदाधिकारी यांचे मनस्वी अभिनंदन!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्यातील २००५ पुर्वी लागलेले व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या शाळेतील जवळपास ३४५०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी जुनी पेंशन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगिताताई शिंदे व समितीचे सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनांचे शस्त्र हाती घेतले.अगोदर सर्व लोकप्रतिनिधी ,मंत्र्यांना निवेदन देण्यात आली. व नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई येथे आझाद मैदानावर १८ जुनपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाचे रणशिंग संगिताताई शिंदेंच्या नेतृत्वाखाली सर्व पेंशनग्रस्त कर्मचारी उभे राहून फुंकले. आझाद मैदानावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वाढती संख्या पाहून अनेक शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, मंत्री,माजी आमदार यांनी भेट देऊन पाठीशी उभे राहण्याची ताकद दिली.
एकूणच राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मध्ये महीला व पुरुष दोघांची उपस्थिती होती. दिनांक १८ जुनपासून सुरू असलेले अमर उपोषण २५ जुन पर्यंत आठ दिवस चालले.त्यात संगिताताई व काही पदाधिकारी यांच्या तब्येती घालावल्या.पण उपोषणाचा ताकद पदाधिकारी यांनी कमी होऊ दिली नाही.
शेवटी आज दिनांक २५ जुन २०१९ ला विधानभवनात संगिताताई व पदाधिकारी यांना चर्चेला आमंत्रित केले,त्यात शिक्षक आमदार ना.गो.गाणार शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की 2005 पूर्वीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पीएफचे खाते पूर्व रात राहतील ते बंद करणार नाहीत तसा आम्ही लगेच अध्यादेश काढणार आहेत व जुनी पेन्शन च्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच एक समिती पंधरा दिवसात आपला अहवाल सादर करून 2005 पूर्वीचे शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.
या लढ्यामध्ये ज्यांनी 34500 कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली आणले आणि आपली लढाई जिंकलेली आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही अश्या रणरागिनी संगीता ताई शिंदे यांचे मनस्वी अभिनंदन व त्यांच्या बरोबर काम करणारे पदाधिकारी यांचे मनस्वी अभिनंदन कोणताही लढा लढायचं असेल व यशस्वी करायचा असेल त्यासाठी एक जूट लागते आणि ती एकजूट संगीता ताईंच्या रूपाने सर्व 2005 पूर्वीचे सर्व कर्मचारी एकाच छताखाली आणले.
जुनी पेन्शन संदर्भात सर्व पेन्शन ग्रस्त शिक्षक बंधू भगिनी मुंबई येथे आझाद मैदानावर आपली सर्व कामे बाजूला ठेवून एकत्र आली त्यांचेही अभिनंदन व सर्व जिल्हाध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी पत्रकार बांधव यांचे मनापासून आभार मानतो भविष्यातही शिक्षकांच्या कोणताही प्रश्न असेल समस्या असेल संगीता ताई शिंदे यांचे नेतृत्वाखाली उभे राहू असे जुनी पेन्शन संघर्ष समितीचे जळगाव जिल्हाध्यक् संभाजी पाटील यांनी बोलतांना सांगितले.
रणरागिणी ताई आपल्या त्यागाचा आम्हांला सार्थ अभिमान आहे......
ताई आपल्या झुंजारकार्यामुळे आणि एकसंघपणे दिलेल्या लढ्यामुळे शासनालादेखील आपल्या कार्याची दखल घ्यावी लागली....
जरी आज मंञीमहोदयांनी आश्वासन दिले असले तरीदेखील आपला हा लढा ठोस निर्णय येईपर्यंत थांबवता कामा नये वारंवार संपर्क करून हा एैतिहासिक निर्णय आपण मिळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो...
एकच मिशन हक्काची जूनी पेन्शन*
सर्व सन्माननीय जूनी पेन्शन योजना वंचित बंधू भगिनींना कळवू इच्छितो की आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आमरण उपोषणाची शासनाने सकारात्मक दखल घेतली आहे.
आज रोजी मा संगीताताई व शिष्टमंडळासह मा.शिक्षणमंत्री महोदयांनी केवळ *जूनी पेन्शनचा लाभ वंचित कर्मचारी या एकमेव विषयासाठी विधान भवनात बैठक घेतली. याबैठकीस शिक्षक आमदार मा ना.गो.गाणार हे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.त्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या निकषातील बारकावे मा मंत्री महोदयांना समजावून सांगितले. त्यानुसार मा. मंत्री महोदयांनी पेन्शन योजनेवर या कर्मचाऱ्यास कायदेशीर हक्क आहे असे मान्य केले. परंतू शासनाचा धोरणात्मक निर्णय एकट्याने घेता येणार नाही. व निर्णय करून घेण्यासाठी कायद्याच्या तरतुदी विचारात घेऊन एक निश्चित दस्त नस्ती तयार करणे गरजेचे आहे.त्यानुसार या विषयासाठी एक अभ्यास समिती नेमावी लागेल.असे सांगितले.
या समितीची रचना कालावधी व कार्यवाही बाबत विचारविनिमय बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे.
परंतू समितीमध्ये मा. संगीताताई व दोन शिक्षक घेण्यास मान्यता दिली.
द्या होणाऱ्या बैठकीत सर्व शैक्षणिक समस्यांवर चर्चा राहील.त्यात या विषयावर चर्चा करण्यास वेळ मिळाली नसती त्यामुळे केवळ या विषयासाठी आज विशेष बैठक घेतली.
जी.पी.एफ.खाते बंद करणेबाबत जे परिपत्रक जारी करण्यात आले होते ते तात्काळ रद्द करतो. असे सांगितले.
समिती नेमण्यात येणार असल्याने समितीची कार्यवाही पूर्ण होई पर्यंत सध्या सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले आहे. असे जळगाव जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले.