Halloween party ideas 2015

2005 पूर्वीची शिक्षक पेन्शनसाठी आझाद मैदानावर

उपोषणाची दखल घेऊन शालेयशिक्षण मंत्री कोर कमिटी च्या सदस्यांना चर्चेसाठी बोलावले.

अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)

2005 पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला पेन्शन संघर्ष समितीच्या राज्य अध्यक्ष संगीता ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत.

आझाद मैदानावरील जुन्या पेन्शनसाठी बसलेल्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांची न्याय मागणी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी उपोषण स्थळी उपस्थिती देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.

आझाद मैदानावरील या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची गर्दी वाढत असताना त्याची दखल म्हणून काही आमदारांनी अधिवेशनात लक्षवेधी करून शासनाच्या निर्दशनास आणून दिले. जोपर्यंत 2005 पूर्वी नियुक्त असलेल्या पण टप्प्याटप्प्याने अनुदान आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन चा हक्क मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे पेन्शन संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीताताई शिंदे यांनी सांगितले.

   मुंबई येथील आझाद मैदानावरील पेन्शनसाठी बसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दखल घेऊन

शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी कोर कमिटीचे सदस्य संगीताताई शिंदे, हिंगे सर, दाणे सर, जोशी मॅडम, भोर सर असे आठ सदस्य मंत्रालयात 6.00pm वाजता रवाना झाले आहेत.

      सर्व राज्यातील पेन्शन पासून वंचित असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच राहतील असे पेन्शन संघर्ष समितीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.