2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पेन्शनची लढाई आता आझाद मैदानावर! हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली ताकद दाखवा- जुनी पेन्शन संघर्ष समिती
चलो आझाद मैदान, आताच हि संंधी आहे, आता नाही तर कधीच नाही,
जुनी पेेंंशन मिळवू या.
अमळनेर प्रतिनिधी
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती व 2005नंतर 100टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे* दि 17 जून पासून सुरू होत असलेल्या शिक्षक आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जुनी पेंशन हक्क समिति यांनी जुन्या पेंशनसाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनासाठी सर्व समस्याग्रस्त शिक्षक व् कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण वा सबब न सांगता आपल्या भवितव्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित रहावे. ही शेवटची लढाई आहै कृपया प्रत्येकाने आपले स्वतःचे काम आहे हि भावना लक्षात ठेऊन 18 जून रोजी आझाद मैदानावर उत्फुर्तपणे सहभागी व्हावे हि विनंती व नसता फक्त बाकी जे सहभागी आहेत त्यांच्या कडुन आंदोलनात काय झाले काय होणार आहे हि वरवरची फुकटी चिंता दाखऊ नये व नंतर गृप मधे देखील बातम्या forward करुन आपल्याला खुप चिंता आहे हे दाखवण्याचा फाजील प्रयत्न करु नये या आंदोलनानंतर जर आपल्या संख्येचा दबाव जर निर्माण झाला नाही तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच आहोत तरी विचार करा व निश्चित सहभागी व्हा असे आवाहन पेन्शन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीताताई शिंदे व सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे