जुनी पेन्शन 2005 पूर्वी
--दुसरा टप्पा यशस्वी करा.
संगिताताई शिंदे
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षण विभागात 2005 पूर्वीच्या विना,अंशतः 100 टक्के अनुदानित शाळेवरील विना अनुदानित नैसर्गिक तुकड्या,अर्धवेळ काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची शासनाने जुनी पेन्शन हिरावून घेतली,ती मिळविण्यासाठी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कृती समिती यांनी येत्या 18 जून पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणचे हत्यार उपसले आहेत,या साठी शासनाला पूर्वीच अवगत करण्यासाठी पहीला टप्पा लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन यशस्वीरीत्या विषय त्यांच्यापर्यंत पोहोचविला आहे*
उद्या दि 15 जून ला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देऊन दुसरा टप्पा यशस्वी करायचा आहे
तरी सर्व माझ्या अन्यायग्रस्त बंधू आणि भगिनींना विनंती करते की आपण आप आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून निवेदन द्यावे असे आवाहन संगीताताई शिंदे राज्याध्यक्ष शिक्षण संघर्ष संघटना महा राज्य यांनी केले आहे.