महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने २० जुनला मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन.
अमळनेर प्रतिनिधी- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी मुंबई येथे 20 जून ला धरणे आंदोलन आझाद मैदानावर होणार आहे तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आयोजकांकडून आव्हान करण्यात आले आहे.
सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की, संघटनेच्यावतीने सातत्याने शासन स्तरावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सर्व मागण्यांच्या अनुषंघाने त्या पुर्ण व्हाव्यात यासाठी विविध प्रकारे दबावगट निर्माण केला जात आहे.
येत्या१७ जुन २०१९ रोजी पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे.
शक्यतो अधिवेशन काळात* आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी कामगार संघटना पुर्ण ताकतीनीशी प्रयत्न करत असतात. मात्र अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही संघटना *अधिवेशन पुर्व * काळातच मोर्चे व आंदोलने काढुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिशाभुल करताना दिसत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. अशा संघटनांना त्यांच्या प्रयत्नात कीतपत यश येईल हे वेळ आल्यावर कळेलच.
आपल्या संघटनेमार्फत येत्या अधिवेशन काळात दि. २० जुन २०१९ रोजी ११.०० वा. आझाद मैदान, मुंबई* ❄ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित प्रश्न व न्याय्य मागण्या शासनाने विनाविलंब पूर्ण कराव्यात. यासाठी *” राज्यव्यापी भव्य धरणे आंदोलन”* आयोजित करण्यात आले आहे.
निवेदनातील मागण्या
❇ मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सींग द्वारे अंगणवाडी *सेविका १५००*, मीनी अंगणवाडी *सेविका १२५०* व *मदतनीस ७५०* रुपये प्रत्येकी दरमाहा मानधनामध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. *सदर मानधनवाढ त्वरित थकबाकीसह लागु करावी.*
❇ *प्रधानमंत्री श्रमयोगी पेंशन योजनेची वयाची अट शिथिल करून* सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *सरसकट सदर पेंशन योजनेचा लाभ लागू* करण्यात यावा.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रोजचे काम *साडेचार तासांऐवजी आठ तास मोजून* त्यांना पुर्णवेळ काम देउन त्यांना *शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.*
❇ *ग्रामीण व नागरी* विभागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या *रिक्त जागा भरणे बाबत लावलेले निर्बंध विनाविलंब उठवावेत*.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरसाल दिल्या जाणाऱ्या *भाऊबीज रकमेत वाढ करत* ती *२००० ऐवजी ५००० रुपये* करण्यात यावी.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरसाल मानधनात *२०% मानधनवाढ* देण्यात यावी.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *किमानवेतन श्रेनीच्या* धर्तीवर *अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना २०,००० रूपये व मदतनिसांना १८,००० रूपये किमान वेतन लागू करण्यात यावे*.
❇ अंगणवाडी कर्मचऱ्यांच्या *अकाली मृत्युनंतर* त्यांच्या *वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यात यावे.*
❇ अंगणवाडी केंद्र स्तरावर मिळणारा *परिवर्तन नीधी २००० रुपये ऐवजी ५००० रुपये करण्यात यावा* तसेच *गणवेशाच्या रकमेत ८०० ऐवजी २००० रुपये वाढ* करण्यात यावी.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच *आजारपनाची रजा लागु करण्यात यावी.*
❇ इतर विभागांमधिल महिलावर्गा प्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *बालसंगोपनाची रजा लागु करण्यात यावी.*
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *श्रावण बाळ पेन्शन योजना तसेच ज्येष्ठ नागरीक पेंशन योजनेचे फायदे देण्यात यावेत*.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा* लाभ देण्यात यावा.
❇ *मीनी* अंगणवाडी केंद्रांचे रुपांतर *नियमीत अंगणवाडी केंद्रांमध्ये* करण्यात यावे.
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रासाठी लागणारे *रजिस्टर्स, छापिल अहवाल व दप्तर* ताबडतोबीने पुरविण्यात यावे.
❇ *नागरी* प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना *सुधारीत घरभाडे लागु करुन मागील थकबाकी त्वरित देण्यात यावी*.
❇ अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना शेजारील *गोवा राज्याप्रमाणे खाण्यायोग्य टि. एच. आर. पुरवण्यात यावा*. उदा- ( कडधान्य ).
❇ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या *सेवासमाप्तिच्या रकमेत वाढ करुन अंगणवाडी सेविका ३ लाख, मदतनीस २ लाख व मीनी अंगणवाडी सेविकांना २ लाख रुपये* देण्यात यावेत.
❇ *३ रे आपत्य * संदर्भातील लहान कुटुंबासंबंधीचा सुधारीत *जी. आर. काढुन दि. १ डिसेंबर २०१८ नंतरच्या काळासाठी तो लागु करण्यात यावा*.
❇ *सण २००८* सालापासून *सेवा समाप्त* झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *पेंशन योजनेत* सहभागी करुन घेण्यात यावे.
या व इतर अनेक प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी *संघटनेचे पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांचे ➡ राज्यव्यापी धरणे आंदोलन* ⬅ आयोजित केलेले आहे.
आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्या पदरात पाडू घेण्यासाठी *राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बहुसंख्येने भागिदारी करून सदर राज्यव्यापी धरणे आंदोलन यशस्वी करावे*. असे आवाहन आम्ही करीत आहोत.
आवाहन कर्तेअध्यक्षा - मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष - रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष - युवराज बैसाणे, ॲड. गजानन थळे, रविंद्र जाधव , दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी केले आहे.