Halloween party ideas 2015

महाराष्ट्र पत्रकार संघाचे पंधरावे राष्ट्रीय स्तरावरील कलागौरव महोत्सव.
महाराष्ट्र भरातील अनेक पत्रकार, संपादक यांची उपस्थिती.
शिक्षक,विद्यार्थी यांचा होणार सन्मान.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र पत्रकार संघ या राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून पत्रकारासाठी पत्रकार कार्यशाळा, पत्रकार गुणगौरव सोहळा,पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायदयासाठी आंदोलने ,पत्रकाराच्या न्याय मागन्यासाठी निवेदने देणे,पत्रकारावर अन्याय झाल्यास त्यांच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रभर आंदोलन व निवेदन देऊन त्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणे,राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित करून विदयार्थीनच्या कलागुणांना वाव देणे.राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना नवरत्न पुरस्काराने सन्मानित करणे,व्हाट्सएपच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर तंज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणणे.असे अनेक उपक्रम महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व राज्य कार्यकारणी ,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून राबविले जातात.
      महाराष्ट्र पत्रकार संघाचे पंधरावे राष्ट्रीय स्तरावरील कलागौरव महोत्सव रविवारी दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सिध्दीविनायक मंगल कार्यालय संगमनेर जि.नगर येथे संपन्न होत आहे. मुक्कामाला येणाऱ्या पत्रकार बांधवाची व कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पत्रकार बांधवाची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी गणेश चौधरी यांच्याशी ८७९६०२९११४ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा .रूटची माहीती हवी असेल तर सुनिल सातपुते ९८२२५१४७९७ यांच्याशी संपर्क करावा असे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,तालुकाध्यक्ष संजय सुर्यवंशी, जिल्हा सदस्य निरंजन पेंढारे, विजय पाटील, उपाध्यक्ष भूषण बिरारी, सचीव भूषण चौधरी,संघटक पकंज लोहार, सल्लागार गं.का.सोनवणे, प्रा.पि.के.पाटील, विजय सुतार व सदस्य यांनी कळविले आहे.

                                                                                                                  

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.