कृषिभूषण पाटील यांच्या मागणीमुळे पाडळसरे धरणावर पाट्या टाकण्याचे काम सुरू
जलसाठ्यात वाढ होऊन बॅक वॉटर 17 किमी पर्यंत जाणार,दुष्काळात दिलासा,शेतीसह शहराचा पाणी प्रश्न सुटणार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर -तालुक्यातील पाडळसे धरणावर असलेल्या पाट्या धरणाच्या कामासाठी अलीकडेच काढण्यात आल्या होत्या. परिणामी जलसाठा कमी होऊन बरेचसे पाणी वाहून जात होते,परंतु यंदा तालुक्यात दुष्काळाचे सावट असल्याने त्याबाबत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आक्षेप घेत सद्यस्थितीचा आढावा देऊन पाट्या काढू नये अशी मागणी लेखी पत्रन्वये दि 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री,जलसंपदा व पालक मंत्र्यांकडे केली होती याची दखल मंत्र्यांनी घेतल्याने पाटबंधारे विभागाने काल शनिवारी काढलेल्या पाट्या पुन्हा लावल्या असून त्यामुळे जलसाठ्यात वाढ होऊन बॅकवॉटर 17 किमी पर्यंत जाणार आहे,परिणामी शेतीसह शहराचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
कृषिभूषण पाटील यांनी याबाबत दिलेल्या पत्रात सतत अवर्षणप्रवण क्षेत्र असलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात वातावरण बदलामुळे 582.20 मिमी पर्जन्यमानापैकी जून व जुलै अखेर सरासरी पर्जन्यमानाच्या 50 टक्क्यापेक्षा कमी म्हणजेच 222. 77 मिलिमीटर 36.26 टक्के आणि 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर अखेर 75 टक्के पेक्षा कमी म्हणजेच 325. 70 मिलिमीटर ( 55. 94% ) होऊन 1 जून ते 31 जुलै व ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2018 टप्प्यात मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन हवालदिल झाले आहे.तसेच 2018 ते 19 खरीप हंगामातील एकूण सरासरी चा पहिला टप्पा 36. 26% मिली आणि दुसरा टप्पा 55. 94 मिली म्हणजेच 50 टक्के आणि 75 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन निसर्ग कोपाची भीती निर्माण झाली आहे. पाडळसे प्रकल्पाचे काम तापी नदीची तळाची पातळी 132. 54 मी पासून पाण्याचा सांडवा बांधकाम मुर्धा पातळी 139.24. सर्व गाळे लांबी 400 मीटर पासून प्रस्तंभ 140 मीटर पर्यंत सर्व पूर्ण झाले आहे, यामुळे निर्माण झालेल्या जलसाठयामुळे सतरा किलोमीटर पर्यंत बॅक वाटर असल्याने पाडळसे ते जळोद नदीच्या दोन्ही काठावरील गावापर्यंत प्रकल्पातून उपसा द्वारे 2600 हेक्टर क्षेत्र सिंचित होऊन अंमळनेर शहरासह तापी नदीच्या दोन्ही काठावरील गावांचीही पशुधनासह लोकांसाठी पिण्याची पाण्याची टंचाई दूर होणार आहे , अमळनेर तालुक्यात मतदारसंघासह कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने वेळीच काळजी घेतली नाही तर पाणीटंचाईचा धोका पत्करावा लागेल त्यासाठी 139. 25 मीटर पर्यंतचा जलसाठा कायम ठेवून तापी नदी काठावरील लाभधारक बळीराजास दिलासा द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना 15 सप्टेंबर रोजी आमदार साहेबराव पाटील यांनी केली होती,
त्या पत्रानुसार पाडळसरे धरणावरील मोकळ्या केलेल्या पाट्या लावण्याचे काम काल शनिवारी सुरू झाले त्यामुळे कृषिभूषण पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.याकामी आ सौ स्मिता वाघ,जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,प्रांतधिकारी,तहसीलदार,कार्यकारी संचालक,अधीक्षक अभियंता यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे कृषिभूषण पाटील यांनी सांगितले.
फोटो
पाडळसरे धरणावर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे धरणावर पाटया टाकण्याचे काम सुरू.
छाया ईश्वर महाजन अमळनेर