*🏅शालेय विद्यार्थ्यांसाठी विचारस्पर्धेचे आयोजन.....दि २५ सप्टेंबर २०१८ पर्यन्त'विचार पाठवण्याचे आवाहन....🏅*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्यातील मराठी,हिंदी,इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक,माध्यंमीक शाळांमध्ये 'पुणे इंटरनॅशनल व 'ज्ञान की वाचनालय,पुणे' यांच्यातर्फ 'राज्यस्तरीय विचार लेखन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वि ते इयत्ता १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्ह्यायचे आहे.
*✍विचारस्पर्धेचा विषय✍*
*""सन २०१९ ते २०२४ करिता भारताचे ध्येय धोरण"""*
विद्यार्थ्यांनी वरील विषयावर आपले विचार( साध्या कागदावर जास्तीत जास्त 15 ते 20 ओळीत) आपले विचार लिहून ,स्वतःचे नाव,शाळेचे नाव,पत्ता,मोबाईल क्रमांक नमूद करून बंद पाकिटात *मा.प्रदिप लोखंडे,पुणे-१३,(एव्हढाच पत्ता लिहला तरी पत्र/लिफाफा बरोबर पोहचतो)*' या पत्त्यावर दिनांक २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत पोस्टाने पाठवायचे आहेत.किंवा vichar@ruralrelations.com या मेलवरही पाठवूं शकता.
(मुख्याध्यापकांनी प्रत्येक वर्गात सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांकडून विचार लिहून त्यावर शाळेच्या शिक्यासह नाव व पत्ता लिहून एकाच लिफाफ्यात पोस्टाने पाठवावे)
......सहभागी सर्व विद्यार्थ्यांना 'पुणे इंटरनॅशनल'यांच्यातर्फ 'प्रशस्तीपत्र'देण्यात येईल.तसेच उत्कृष्ट विचार लिहून पाठवणार्या विद्यार्थ्यांमधून जिल्हा, विभाग, राज्यस्तर यानुसार पारितोषिक विजेत्यां विद्यार्थ्यांना डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.विजय केळकर,डॉ.विजय भटकर,श्री.जब्बार पटेल ,खा.अनु आगा यांच्याहस्ते रोख पारितोषिके देण्यात येतील.०९ ऑक्टोबर २०१८ रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे प्रक्षेपण राज्यातील विविध न्यूज चॅनलवर दाखवले जाणार आहे. पारितोषिक वितरण समारंभासाठी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणाऱ्या पालक/एक शिक्षक यांना प्रवासभाडे देण्यात येईल.
*🏆प्रथम बक्षीस-रु ३,०००(तीन हजार) (एकूण ०५ बक्षिसे)🏆*
*🏆द्वितीय बक्षीस- रु.२०००(दोन हजार)(एकूण ०५ बक्षिसे)*
*🏆प्रोत्साहनपर बक्षीस-१०००(एक हजार रुपये)(एकूण ०५बक्षिसे)🏆*
*🏅सर्व बक्षिसासोबत एक परितोषिकही दिले जाणार आहे🏅*
........वरील स्पर्धेत मुंबई,ठाणे या जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमाच्या माध्यमिक,प्राथमिक शाळासह आदिवासी विभागाच्या शाळा,अल्पसंख्यांक शाळामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ही विंनती. त्यासाठी मुख्याध्यापक,शिक्षक बंधूंनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कळावे.
*प्रवीण महाजन,पुणे*
pravinpune123@gmail.com