राजकीय
*वार्तापत्र
डझनभर उमेदवार उभे,ज्यांना शिक्षक पेशाशी संबध नाही तेही रिंगणात
*खरा टि.डी.एफचा उमेदवार कोण हे न उलगडलेले कोडे.*
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)-नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक सात दिवसावर येऊन ठेपली. २५ जुन रोजी निवडणुकीची तारीख जवळ आल्याने प्रचाराला गती आली आहे. प्रचारात संस्थाचालक व त्याच्या शाळेतील शिक्षक प्रचार कामात गुंतलेली दिसत आहेत.
एका जागेसाठी हौसे नवशै दिड डझनभर उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते.माघारीनंतर आता डझनभर उमेदवार आपले भाग्य आजमावतांना दिसत आहे. आतापर्यंत शिक्षक आमदारकीची निवडणूक शिक्षकापुरती मर्यादित होती.आता राजकीय पक्ष यामध्ये हस्तक्षेप करतांना दिसत आहे.ज्याचा शिक्षण क्षेत्राशी काडीमात्र संबध नाही ,तेही निवडणूक लढवतांना दिसत आहे.सोशलमिडीया सध्या प्रचाराचे मोठे साधन ठरले आहे.
अगोदर टि.डी.एफचा एक उमेदवार निवडणूक लढवायचा आणि निवडणून येत होता.सध्या संघटनेमध्ये हेवेदावे,पदासाठी वाटेल ते सुरू झाल्याने संघटना खिळखिळी झाली. संघटनेतुनच कला शिक्षक शालीग्राम भिरूड,महाविदयालयीन प्राध्यापक
भाऊसाहेब कचरे पाटील ,हंगामी प्राध्यापक
संदीप बेडसे यांना शिक्षक भारती या संघटनेने पाठिंबा दिला आहे.
पदवीधर उमेदवार किशोर दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने शिवसेनेसाठी चुरशीची झाली आहे.
कांग्रेसमधुन उमेदवारीसाठी भाजपमध्ये गेलेले अनिकेत पाटील हे संस्थाचालक आहेत. त्यांना निवडुन आणण्यासाठी भाजपाचे डझनभर नेते
प्रचारासाठी रिंगणात आहेत.
,आप्पासाहेब शिंदे. यांचेही काम संघटनेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे.
एवढे या उमेदवारामध्ये टि.डी.एफचा कोण हे सांगणे कठीण आहे.सर्वच म्हणतात मीच टिडी एफचा त्यामुळे शिक्षकामध्ये द्विधा निर्माण झाली आहे. वरील उमेदवारामध्ये एक कला शिक्षक ,एक पुर्ण वेळ प्राध्यापक, एक हंगामी प्राध्यापक, एक पदवीधर, काहीचा शिक्षक पेशाशी काडीमात्र संबध नाही असे उमेदवार उभे आहेत.अपक्ष उमेदवारामध्ये विलासराव शांताराम पाटील हे तिसऱ्यादा आपले भाग्य आजमवत आहे.ते माध्यमिक शिक्षक व चळवळीचे कार्यकर्ते असून त्याच्याबद्दल शिक्षकामध्ये सहानभुतीची लाट दिसत आहे.त्याचा प्रचार जोरात सूरू असल्याचे बोलले जात आहे.
सध्या प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी राजकीय नेते ,पालकमंत्री शिक्षक आमदारकीच्या प्रचारसभामध्ये रस घेतांना दिसत आहे.कालच अनिकेत पाटील यांच्यासाठी अमळनेर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सभा झाली.
परंतु अगोदरच सध्याच्या सरकारने शिक्षण क्षेत्रात चार वर्षात एक हजार जी.आर काढल्याने शिक्षक वर्ग जेरीस आला आहे व कर्मचारी वर्गापासून ,शेतकरी
भाजप सरकारला कंटाळलेले आहेत अशी चर्चा शिक्षकामध्ये जोर धरत आहे.
त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आर्थीक उलाढाल मोठी होण्याची काही उमेदवारामध्ये स्पर्धा होईल व निवडणून येण्यासाठी कोणत्याही मार्गाला जातील अशी चर्चा शिक्षकामध्ये सुरू आहे.परंतु काही उमेदवारांच्या संस्था आहेत त्यातील मतदान किती?निवडणून येण्यासाठी किती लागतील?किती मतदान विकत घ्यावे लागतील ?असे गणिते सध्या सुरू आहेत.
आज नाशिक मतदार संघात नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार, नगर, जळगांव जिल्ह्यात ५४०००० हजार मतदार आहेत. जर शिक्षक नसलेला उमेदवार शिक्षक आमदार झाला तर शिक्षण क्षेत्रात अजुन समस्या जटील होतील हे निश्चित. शिक्षक बांधवानी व भगिनींनी थोडे आत्मपरीक्षण करूण शिक्षण क्षैत्रातील उमेदवारालाच निवडून दिले तरच शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतील नाहीतर "ये रे माझ्या मागल्या " झाल्यावाचून राहणार नाही.