Halloween party ideas 2015

*देवगांव देवळी हायस्कुलचा दहावीचा निकाल 97:82*
*निकीता माळी प्रथम,तर द्वितीय विशाल महाजन*
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कुलचा मार्च 2018 चा दहावीचा निकाल 97:82 इतका लागला.यावर्षी शाळेचे 46 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.परंतु परीक्षेला 45 विद्यार्थी उपस्थित राहिले त्यामुळे शाळेचे 45 विद्यार्थी पास झाले. या वर्षाचे वैशिष्ट्ये म्हणजे मागच्या वर्षी मुलगीने बाजी मारली होती.यावर्षी निकीता ज्ञानेश्वर माळी ही 86:60 गुण मिळवून प्रथम आली,द्वितीय विशाल संजय  महाजन 86:60,तृतीय अविनाश महाजन 85:20,चतुर्थ अमोल अरूण महाजन 84 टक्के गुण मिळवून यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांचा निकालात कमालीची वाढ झाली.
    प्रथम आलेली निकीता माळी हिचे वडील आळुचे पाने विकतात, परंतु त्यांनी मुलीला नेहमी प्रोत्साहन दिले,शाळेत शिक्षकांचे मार्गदर्शन, सतत अभ्यास व सराव यामुळे माझा पहिला नंबर आला,पुढे मला बारावी विज्ञान शाखेत करायचे आहे असे सांगितले,
उत्तीर्ण विदयार्थीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, सचीव मंदाकिनी शांताराम पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन,व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.