अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) -कवी विंदा करंदीकर यांच्या मराठी कवीतेतील ओळी आठवतात"
देणाऱ्याने देत जावे !
घेणाऱ्याने घेत जावे !!
घेता घेता !
देणाऱ्याचे हात घ्यावे !!
हि दाततृत्व वृत्ती जोपासणारे पूण्यात्मे अलीकडे दुर्मिळ आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिक आपल्या कामात मग्न आहे.प्रत्येक नागरिक स्वतासाठी जगतातच पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे दुर्मिळ असतात.असेच कळमसरे येथील उपसरपंच व खान्देश माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मुरलीधर राजाराम महाजन हे ध्येयवादी, तत्वनिष्ठ व गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असतात.
समाजात काही माणसं आपल्या कर्तृत्वाने इतकी मोठी व आदरणीय होतात त्यामुळे ते समाजाचे भुषण व अलंकार बनतात. कळमसरे गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असतात, खान्देश माळी महासंघाच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांचे विवाह विनामुल्य लावण्याचे काम केले आहे.ररत्यांच्या वाटेवर कोणी गरीब असेल तर त्याची विचारपुस करणे व भुकेल्यांना पोटभर जेवण देणे जणू त्यांचा छंदच आहे.
कळमसरे येथील उपसरपंच मुरलीधर महाजन कामानिमित्त जळगांवला असतांना त्याचे लक्ष एका भिकारीकडे गेले.जो दोन दिवसापासून भुकेला होता,पाण्याची तहान लागलेली होती.क्षणाचा विचार न करता त्याला पोटभर अन्न व पाणी दिल्यामुळे त्याला खुपच बरं वाटलं. परंतू धावपळीच्या जीवनात कुणाला कुणाची विचारपूस करायला वेळ नाही कळमसरे गावात प्रत्येक समाजात सामाजिक बांधीलकी प्रत्येक समाजाच्या नसानसात भिनलेली आहे. परंतू समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून कळमसरे येथील उपसरपंच मुरलीधर महाजन हे सामाजिक बांधीलकी जोपासत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो
दातृत्वाची परमछाया मुरलीधर महाजन भुकलेल्या वृदधांची विचारपुस करूण पोटभर अन्न देतांना
(छाया ईश्वर महाजन अमळनेर)