Halloween party ideas 2015

समाजकार्यत हरविलेलं व्यक्तिमत्त्व- गणेश हिरवे

जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे राहणारे आमचे मित्र,सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने शिक्षक असलेले गणेश हिरवे हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत असलेलं मी व आपण सर्वांनी पाहिलं असेलच. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात जे संकट उभं राहिलं व यात ज्यांचे हातावर पोट आहे व जे मोल मोलमजुरी व दैनंदिन कामकाज करून पोट भरत होते,त्यांचा लॉकडाउन मुळे रोजगार बुडल्याने त्यांची उपासमार झाली असताना आशा कुटुंबाना जीवनावश्यक अन्नधान्य वस्तू ( किराणा ) पुरविण्याचे काम गणेश हिरवे यांनी आपल्या जॉय ऑफ गिविंग संस्था आणि स्वतः पदरमोड करून वैयक्तिकपणे व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने करून आतापर्यंत जवळपास दोन हजाराहुन अधिक परिवाराला किराणा किट सुपूर्द करून त्यांना मदत केलेली आहे. 23 मार्चला लॉकडाउन सुरू झाल्याबरोबरच हिरवे सरांनी सामाजिक जबाबदारी म्हणून दि २९ मार्च रोजी २९ व्या वेळी व ३० ऑगस्ट २०२० रोजी असे दोन वेळा वैयक्तिकपणे रक्तदान केले व आतापर्यंत एकूण ३० वेळा स्वेच्छेने रक्तदान केलेलं आहे. वर्षातून किमान दोन ते तीन वेळा सर रक्तदान करतातच. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मुंबई,महराष्ट्र व दिल्लीस्थित अनेक संस्थांकडून गौरविण्यात आले असून आतापर्यंत त्यांना " कोरोना योद्धा " म्हणून एकूण ६३ सन्मानपत्र प्राप्त झाली आहेत. गणेश हिरवे यांचा धपडणारा स्वभाव,समाजकार्यत स्वतःला झोकून देऊन कार्य करणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही, मात्र हिरवे सरांचे कार्य व त्यातील तत्परता जर आपण पाहिली तर हा माणूस इतक्या सर्व गोष्टी यशस्वीपणे कशा करू शकतो याचे सर्व नागरिकांना अप्रूप वाटते.
पत्रलेखनाच्या माध्यमातून आपले सामाजिक जीवन सुरू करणाऱ्या गणेश हिरवे यांचा मूळ पेशा हा शिक्षकी आहे.ज्ञानदानातील अद्वितीय कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबच समाजिक कार्य व पत्रलेखनासाठी आतापर्यंत जवळपास १०० हुन अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. जोगेश्वरी मुंबई येथे वास्तव्यास असणारे हिरवेसर परिसरातील सामाजिक,शैक्षणिक,धर्मिक,राजकीय व क्रीडाविषयक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतात, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे व माणस जोडण्याचा त्यांना मोठा छंदच आहे. निस्वार्थ भावनेने समाजकार्य करणारी अनेक माणसं त्यांनी आपल्या जॉय संस्थेच्या माध्यमातून जोडलेली,ज्यांच्या माध्यमातून त्यांनी अनाथ,वृद्ध,गोरगरीब व वंचित लोकांसाठी सामाजिक उपक्रम साजरे केले आहेत व म्हणूनच त्यांच्या या उपक्रमांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा अभिमानच वाटतो. जोगेश्वरी येथील श्री समर्थ विधालय स्कूल कमिटीचे ते सभासद आहेत. राजहंस प्रतिष्ठण गोरेगावचे ते सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी स्वतः नेत्रदान,त्वचादान व अवयवदानासाठी नोंदणी केलेली आहे व अवयवदान चळवळकामासाठी त्यांची जनजागृती सुरू आहे.माजी पोलीस आयुक्त ( ACP ) श्री वसंत ढोबळेसाहेब यांच्या " मिसिंग पर्सन ब्युरो " या हरविलेल्या मुलं व व्यक्ती शोधून काढणार्या संस्थेसाठी देखील हिरवे कार्यरत आहेत तर विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या "धडक कामगार संघटनेचे ते कौन्सिल मेंबर आहेत.मुंबई व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था व संघटना, उत्सव मंडळांवर,पत्रकार व पत्रलेखक संघटना सर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून नामदेव समजोन्नती परिषद महाराष्ट्र राज्य यांचे राज्य कार्यकारिणी सभासद आहेत, संत निरंकारी मंडळाचे प्रचारक, ए पी जे अब्दुल कलाम मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे संस्थापक, युथ कौन्सिल नावीमुंबईचे मार्गदर्शक, विधार्थचे लाडके शिक्षक व टीडीएफ शिक्षक संघटना पदाधिकारी असा त्यांचा सामाजिक क्षेत्रातील प्रवास व लेखाजोखा आहे. इतका सर्व व्याप सांभाळून ते कायमच मित्रमंडळीबरोबर संपर्कात राहतात व विविध प्रश्नांवर चर्चा करतात, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. वाचनाची आवड जोपास्ता यावी व ती वृद्धिंगत व्हावी यासाठी सरांनी स्वतः पडामोड करून समाजातील विविध लोकांना व वाचनालयाना आतपर्यत बारा हजाराहून अधिक पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत व आजही त्यांचा हा पुस्तक भेट देण्याचा छंद अविरतपणे सुरू आहे. अत्यंत प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करणारी गणेश हिरवे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्व खरतर या मतलबी दुनियेत दुर्मिळच आहेत.त्यामुळे साऱ्यांनाच त्यांचा हेवा वाटतो.सामाजिक सेवेतील व्यापातून पुरेसा वेळ काढून त्यांनी आपले कौटुंबीक स्वास्थ देखील उत्तम जपले आहे.शिक्षिका असलेली पत्नी व दोन मुलं असा त्यांचा परिवार असून त्यांच्याविषयी बोलताना नेहमीच सरांची परिवाराप्रति असलेली अतूट जोड व निःसंदिग्ध प्रेमभावना प्रकट होते. ईश्वर गणेश हिरवे सरांना लोकसेवेसाठी उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा !
सुभाष मुळे
कार्यलयीन सचिव
नासप पुणे


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.